निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे प्रा. राजेंद्र केशवे यांचा नागरी सत्कार.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडीनंतर माहूरमध्ये जल्लोष; पत्रकार संघाकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे प्रा. राजेंद्र केशवे यांचा नागरी सत्कार.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडीनंतर माहूरमध्ये जल्लोष; पत्रकार संघाकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव

माहेमूद पिंजारी
 तालुका प्रतिनिधी देगलूर 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माहूर मतदारसंघातून बहुमताने विजयी होत संचालकपदी निवड झालेल्या माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे यांचा निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, माहूरतर्फे मंगळवारी (दि. २८ जुलै) शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या विजयानंतर माहूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.प्रा. राजेंद्र केशवे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी मिळविलेला विजय हा माहूर तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सर्वसामान्य शेतकरी व सभासदांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांच्या निवडीकडून ग्रामीण भागाच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे निर्णय घेण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.सत्कार समारंभात पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. केशवे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, शहराध्यक्ष कुंदन तीवडकर, कोषाध्यक्ष सुरेश राठोड, सदस्य संजय वडसकर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते. उपस्थितांनी प्रा. केशवे यांच्या कार्याचा गौरव करत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या माध्यमातून सकारात्मक काम होईल, असा विश्वास व्यक्त केला.दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रा. राजेंद्र केशवे यांचे माहूर शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केले. समर्थकांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंदोत्सव साजरा केला. शहरातील प्रमुख मार्गांवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. विजयाचा जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण माहूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपस्थितांनी प्रा. राजेंद्र केशवे यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तसेच तालुक्यातील शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post