कोरोना काळात प्राणवायूसाठी वृक्षांचे मोठे योगदान वृक्ष लावगड करताना राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराजांचे प्रतिपादनबाबा सोनापीर दर्गाह परिसरात मीयावाकी वृक्षांची लावगड दर्गाह परिसरात अटल आनंदवन घनवन वृक्ष लागवड प्रकल्पाचा राष्ट्रसंत साईनाथ महाराजांच्या हस्ते शुभारंभ

कोरोना काळात प्राणवायूसाठी वृक्षांचे मोठे योगदान 
वृक्ष लावगड करताना राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराजांचे प्रतिपादन

बाबा सोनापीर दर्गाह परिसरात मीयावाकी वृक्षांची लावगड 

दर्गाह परिसरात अटल आनंदवन घनवन वृक्ष लागवड प्रकल्पाचा राष्ट्रसंत साईनाथ महाराजांच्या हस्ते शुभारंभ

(श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड माहूरगड )

माहूर शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा सोनापीर दर्गाह परिसरात असलेल्या जागेत सामाजिक वनीकरण विभाग नांदेड च्या वतीने अटल आनंदवन घनवन प्रकल्प योजनेअंतर्गत 30 हजार झाडे लावण्याच्या प्रकल्पाची श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश राज्याचे स्वच्छता दूत ब्रँड अँबेसिडर राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते दि 13 रोजी वृक्ष लागवड करून शुभारंभ करण्यात आला

सामाजिक वनीकरण विभागाच्या किनवट  कार्यालयाकडून अडीच एकर मध्ये टप्प्याटप्प्याने तीस हजार वृक्षांची लागवड येथे होणार आहे बारा हजार वृक्ष लावगडीची सुरुवात माहूर शहरात बाबा सोनापीर दर्गाह परिसरात अटल आनंदवन घनवन योजनेअंतर्गत मीयावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीचा पहिला प्रकल्प जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सामाजिक वनीकरणाचे उपवनसंरक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांचे सह सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस एच संघई सोनापीर बाबा दर्गाह चे मुतवल्ली मुजावर बाबर अहमद फकीर मोहम्मद वनपाल मा पि सूर्यवंशी पत्रकार विजय आमले वनपाल एस बी दासरवाड पत्रकार वसंतराव कपाटे ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत बाबर पत्रकार मनोज कीर्तने श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर पत्रकार राज ठाकूर इलियास बावाणी सय्यद किरमाणी यांचे सह वनरक्षक एस डी खामकर सारिका माहुरे गीते मॅडम विशाल डोईफोडे यांचे सह मान्यवर उपस्थित होते

यावेळी राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराजांनी कोरोना काळात लाखो लोकांना प्राणवायू देत वृक्षांनी वाचविल्याचे सांगत वृक्षापासून मिळणारे ऑक्सिजन हे पुढील काळात येणाऱ्या अनेक संकटापासून वाचविणारे असल्याने प्रत्येक घरात नागरिकांनी वृक्षांची जोपासना करावी असे आवाहन यावेळी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक एस डी खामकर यांनी केले आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी एस एच संघई यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
Previous Post Next Post