माहूर गडावर भाविकांच्या कारला अपघात ..
एक महिला गंभीर जखमी.. कारचे इंजन तुटले ..
( तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड माहूरगड )
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील भाविक आपल्या कारणे बासर येथे दर्शन घेत माहूर गडावर आले असता दर्शन करून परत जात असताना श्री रेणुका देवी मंदिराच्या खालील घाटात दुसऱ्या वळणावर कारचे अचानक संतुलन बिघडल्याने कार णालीवरून पलीकडे जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर आदळल्याने कारचे इंजन तुटून कार मधील एक महिला भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना दि 12 रोजी दुपारी 4 वाजता घडली आहे
हिंगोली जिल्ह्यातील बालाजी साळवे 64 वर्ष त्यांची पत्नी उज्वला साळवे 58 वर्ष मुलगा प्रमोद साळवे सून श्वेता साळवे नातू श्रेयांस साळवे हे आपले मित्र लढा यांच्या कार क्रM H 26 BH 2723G ने सकाळी बासर ला गेले होते येथून दर्शन करून माहूर गडावर आले असता येथे त्यांनी श्री दत्त शिखर संस्थान श्री अनुसया माता संस्थान श्री रेणुका देवी संस्थानवर दर्शन घेऊन दुपारी चार वाजता परत जाण्यासाठी निघाले असता त्यांची कार दुसऱ्या वळणावर आल्यानंतर अचानकपणे संतुलन बिघडल्याने कार सरळ नालीवरून मातीचा ढिगाऱ्यावर जाऊन आदळली यामध्ये कारचे इंजन तुटले तर आत बसलेले उज्वला साळवे यांना त्यांच्या खांद्यावर मुक्का मार लागला तर इतरही भाविकांना किरकोळ मुका मार लागला उपस्थित भाविकांनी पोलिसांना ही कल्पना दिल्याने पोनी देविदास चोपडे सपोनी शरद घोडके यांचे सह पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने श्री रेणुका देवी येथील अंबुलन्स श्री विनोद जाधव ड्रायव्हर यांनी तात्काळ माहूरच्या रुग्णालयात आणले असता येथे त्यांचे वर मंगेश नागरगोजे परिचारिका तरटे कुबडे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलविले

