*पोलीस स्टेशन माना**ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलीसांची जुगार अडयावर धाड टाकून १४ आरोपींवर कार्यवाही करुन एकूण ६,२९,७३५ रु. चा मुद्देमाल जप्त.*

*पोलीस स्टेशन माना*

*ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलीसांची जुगार अडयावर धाड टाकून १४ आरोपींवर कार्यवाही करुन एकूण ६,२९,७३५ रु. चा मुद्देमाल जप्त.*


(मीडिया पोलिस टाईम अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान)


मा. पोलीस अधिकक्षक, अकोला श्री. अर्चीत चांडक साहेब यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलीसांनी दि. २९/०७/२०२६ रोजी सायंकाळी मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीव्दारे रामटेक शेत शिवारातील मोठा नाला पात्रात सार्वजनीक ठिकाणी काही लोक ५२ ताश पत्यावर पैशाच्या हारजीतचा तीन पानी नावाचा जुगार खेळत आहे. अशा खात्रीलायक माहीतीवरुन ठाणेदार गणेश नावकार यांनी पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी जावून जूगार रेड केली असता तेथे १) जमील शहा नजीर शहा वयः ३५ वर्षे, २) सुनील महादेव वाट वयः ४४ वर्षे, ३) विनोद उत्तम माहोरे वयः- ४५ वर्षे, ४) इमरान अहेमद अलताफ अहेमद वय: ३० वर्षे, ५) दिनेश किसन गवई वयः-३५ वर्षे, ६) अमोल रमेशराव कोटेकर वयः-२९ वर्षे, ७) स्वप्नील जिवन वाघपांजर वयः-२५ वर्षे ८) जितेंद्र वामनराव गणोरकर वयः-३५ वर्षे, ९) सागर अशोक अंभोरे वयः-२६ वर्षे, १०) अजय वासूदेव इंगोले वयः-२६ वर्षे, ११) भुषण सुभाषराव काळे वयः-३० वर्षे रा. १२) अक्षय पंजाब सरदार वयः-२४ वर्षे, १३) सैयद मूजफर सैयद गफार वयः-५० वर्षे, १४) अजय रंगराव गेबड वयः-२४ वर्षे, सर्व राहणार कुरुम, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला असे आरोपी मिळून आले असता त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनीयम अंतर्गत कार्यवाही करुन वरील आरोपींच्या ताब्यातून नगदी ९,७३५ रु. व १२ मोबाईल फोन की. १,८०,००० रु. व ०५ मोटार सायकल की.  ४,४०,००० असा एकूण ६,२९,७३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला आहे.
           सदरची कार्यवाही मा. श्री. अर्चीत चांडक साहेब, पोलीस अधीक्षक अकोला, मा. श्री. बी. चंद्रकांत रेड्डी साहेब अपर पोलिस अधीक्षक, अकोला, मा. श्रीमती वैशाली मूळे मॅडम, उपविभागीय पोलिस अधीकारी, उपविभाग मुर्तीजापूर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस स्टेशन माना चे ठाणेदार गणेश नावकार, पोउपनि प्रदिप जोगदंड, जिपोउपनि वैजनाथ धूळे, पो. हवा उमेश हरमकर, मनोहर इंगळे, पो. कॉ. पंकज आढाव, मंगेश पवार, अक्षय आगलावे, चालक पो. कॉ. ललीत बनचरे, पोलीस स्टेशन माना, अकोला यांनी केली.
Previous Post Next Post