*१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत**शुन्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरुपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’*

*१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत*

*शुन्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरुपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’*


(मुंबई जिल्हा विभागीय संपादक)

*(आर.बी.एस.के.) कार्यान्वित करण्यात आलेला आहे*. 

*या आर.बी.एस.के* 
*अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल*
 आणि
*पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांंच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत*. 

*याबाबतचा करार राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाने नुकताच हॉस्पिटलसोबत केला आहे.*

*यामुळे बालकांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज पालकांना आता नाही.*

*या करारानूसार शुन्य ते १८ वयोगटातील बालकांसाठी न-हे येथील काशीबाई नवले हॉस्पटलमध्ये जन्मजात हृदयरोग*
(कंजेनायटल हर्ट डिसिज), 
*अस्थिरोग शस्त्रक्रिया*, 
*प्लास्टिक सर्जरी*, 
*मेंदूची शस्त्रक्रिया* (न्युरो सर्जरी), 
*दातांची शल्यचिकित्सा*
 (डेंटल सर्जरी), 
*कानाचे उपचार* (इ.एन.टी.) 
आणि 
*डोळ्यांचे  उपचार* (आप्थॉल्मालॉजी) 
*मोफत होणार आहेत.*

*आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्येही प्लास्टिक सर्जरी*
 (फाटलेली, दुभंगलेली टाळू),
 *-हदयशल्यचिकित्सा*, 
*अस्थिरोग शस्त्रक्रिया* (ऑर्थोपेडिक सर्जरी), 
*मेंदूची शस्त्रक्रिया*
 (न्युरो सर्जरी), 
*दातांची शस्त्रक्रिया* (डेंटल सर्जरी), 
*ऐकु येण्यासाठी क्वाक्लिअर इंप्लांट* आणि 
*डोळ्यांचे उपचार*. 

*हे उपचार केले जाणार आहेत*. 

*हे उपचार झाल्यावर त्याचे पैसे आर.बी.एस.के.ने ठरवलेल्या दरांनूसार देण्यात येणार आहेत.*  

*पुण्यासह नाशिक, वर्धा आणि मुंबईतही यासाठी हॉस्पिटल देण्यात आले आहेत*.

*तेथेही उपचार होतील*. 

नाशिक येथे 
*सुयोग हॉस्पिटल*
 व 
चोपडा मेडिकेअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंट*, 
मुंबईतील 
*कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल*
 आणि 
वर्धा येथे 
*आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटल*
 यांचा समावेश आहे. 

*धीरुभाई अंबानी हॉस्पिटल* 
मध्ये जन्मजात हृदयरोगावर उपचार होतील 
तर इतर हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे -हदयरोगासह इतरही उपचार होतील.
              ***
Previous Post Next Post