*रत्नापूर टोल नाक्यावरून टोल वसूलीस प्रारंभ*
*राष्ट्रिय महामार्ग ६१ वरील टोल वसूलीस प्रारंभ*
———————
(मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.)
मानवत तालूक्यातून जाणार्या राष्ट्रिय महामार्गा ६१ वरील रत्नापूर येथील टोल नाक्यावर टोल वसूली सूरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की , पाथरी विधान सभा मतदार संघातील रत्नापूर टोल नाक्याचे काम रखडले होते. गेल्या अनेक वर्षापासून कामे बंद केल्याने हा टोल नाका कधीच सूरू होणार नाही अशी नागरिकांना व मनसे सैनिकांना आशा होती.
पण अचानक कोणता ही गाजावाजा न करता परभणी जिल्हातील व पाथरी विधान सभा मतदार संघातील टोल नाका आज दिनांक १८ जूलै रोज शनिवारी सकाळ पासूनच टोल वसूली सूरू करण्यात आली असल्याने वाहन चालकामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
तर नविन असल्यामुळे वाहन चालकांशी वादावादी होत असल्याने वाहतूकीची कोंडी होतांना दिसत आहे.
पाथरी परभणी रस्त्यावरील रत्नापूर टोल नाका चालू झाला

