वृक्षारोपणाने साजरा झाला सहकार सप्ताह...l
" वृक्ष संवर्धन ही काळाची गरज..."
वृक्ष सेवा समितीच्या राज्याभिषेक ते शिवजयंती वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत शासकीय अधिकारी व सहकारी संस्थांचा पर्यावरण संकल्प!
(राजु कांबळे
मीडीया पोलीस टाईम
वर्धा,अमरावती, नागपूर विभागीय संपादक )
सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग अधिक समृद्ध करत, 'सहकार सप्ताहा'चे औचित्य साधून वर्ध्यात एक स्तुत्य पर्यावरण उपक्रम राबविण्यात आला. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (वर्धा), जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था आणि वृक्ष सेवा समितीच्या राज्याभिषेक ते शिवजयंती वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत सिंधी मेघे येथील स्मशानभूमी लगतच्या टेकडीवर भव्य वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
"वृक्षसंवर्धन ही काळाची गरज"
या पर्यावरण मोहिमेला मुख्य मार्गदर्शक म्हणून वर्धा येथील माननीय सहाय्यक निबंधक सुचिता गुघाणे उपस्थित होत्या. वृक्षारोपण करताना त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. "केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नसून, लावलेल्या रोपांचे जतन व संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. सहकार क्षेत्रातील सर्वांनी मिळून घेतलेला हा पुढाकार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नक्कीच मोलाचा ठरेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिकारी व संस्थांचा उस्फूर्त सहभाग
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी श्रेणी-१ आशिष बगमारे, सहकार अधिकारी श्रेणी-२ नरेंद्र नागतोडे, आणि कनिष्ठ लिपिक खेमचंद कोरचा यांनी विशेष परिश्रम घेतले.
या हरित मोहिमेमध्ये वृक्ष सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह वर्धा परिसरातील विविध नागरी सहकारी संस्था, ग्रामीण संस्था, कर्मचारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था आणि बेरोजगार सहकारी संस्थांचे सन्माननीय पदाधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक आणि उस्फूर्त सहकार्याने हा वृक्षारोपणाचा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला भूषण पाटील, प्रदीप मेंढे, रवींद्र नागपूरकर,भानुदास सोमनाथे,अरुण कोटगीलवार, ओमकुमार कडू,लोकेश निनावे,अजय दाखोडे,उमंग तेलरांधे, प्रविण तांबोळी, योगेश लेंढे,गजानन गुल्हाने, Simply बिसन,ओकार नाडे, सतीश बिसे उपस्थित होते.

