भराडी:- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी येथे शाळा प्रवेश महोत्सवाचे आयोजन..

भराडी:- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी येथे शाळा प्रवेश महोत्सवाचे आयोजन..

(भराडी प्रतिनिधी मकसुद शेख)

 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम यांच्या प्रेरणेने आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती अश्विनी लाटकर, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शिक्षण सभापती जिल्हा परिषद श्रीमती अनिताताई मोठे, पंचायत समिती सभापती श्रीमती अनिताताई बनकर, गटविकास अधिकारी साहेब रत्नाकर पगार, शिक्षणाधिकारी श्री राजेश महाजन, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री रमेश ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजू फुसे, यांच्या आदेशानुसार संपन्न
झाला,याप्रसंगी मुलांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आला तसेच इयत्ता पहिली मध्ये नव्यानेच प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी  जिल्हा परिषद सदस्य श्री. राधाकृष्ण काकडे, पंचायत समिती सदस्य श्री. नारायण खोमणे, पंचायत समिती सदस्य श्रीमती वृषालीताई मिरकर यांनी भराडी केंद्रातील विविध शाळांना भेट देऊन प्रवेश उत्सवामध्ये सहभाग नोंदवला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भराडी येथे याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य श्री. राधाकृष्ण काकडे यांनी सांगितले की जिल्हा परिषद शाळांना ज्याही शैक्षणिक सुविधा अपूर्ण असतील त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची राहील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता व विद्यार्थी संख्या वाढवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळा टिकल्या तर सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेऊन पुढे जातील अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे तसेच पोलीस स्टेशन ग्रामीणचे कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर दिनेश कोल्हे आपल्या मनोगत म्हणाले की मीही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी असून जिल्हा परिषद शाळेने माझ्यावर जे संस्कार केले त्या संस्कारातूनच मी घडलो. आज माझे यश हे जिल्हा परिषद शाळेला समर्पित करतो अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, रघुनाथ पांडव, पोलीस पाटील राकडे ताई, आरोग्य अधिकारी श्रीमती आपतवार मॅडम, शालेय अध्यक्ष अंबादास खोमणे. उपाध्यक्ष गोरख राकडे, सदस्य,अनिल अक्कर, अमोल शेळके, उर्दू समितीचे अध्यक्ष इद्रिस पठाण, उपाध्यक्ष जावेद पठाण, आधी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी  केंद्रप्रमुख राजू महाजन, केंद्रीय मुख्याध्यापक दीपक सोनवणे, शिक्षक मथाजी काकडे, सय्यद मुस्ताक व शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केला
Previous Post Next Post