कामगार मंत्र्यांना दिलेले निवेदन
चचैत.......
कंत्राटी सफाई कामगारांच्या
वेतनाचा 30 लाखाचा गल्ला
गेला कुठे?
(महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक चंद्रपूर)
लक्षवेधी
*****************
महेश पानसे.
भद्रावती :- मूल नगरपालिकेच्या घनकचरा
व्यवस्थापनातील सर्व सफाई कत्राटी कामगारांनी गत अनेक सालापासून मजूरीवाढीवर सुरू
असलेल्या प़शाशनाच्या बनवाबनवी विरोधात दोन दिवसीय कामबंद आंदोलन केले, घंटागाडी
थांबली. नगरवासियांनी हुंकार भरला व थातूरमातूर चचाॅ घडून
कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्यानंतर भा. ज. पा. युवा मोर्चा तफै कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांना दिलेल्या निवेदनातून ज्या आथिंक अपारदर्शक बाबी पुढे येत आहेत
त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या
दिसतात. प्रथम दशॅनी निवेदनातील आकडेवारी व आरोपावरून न. प. प़शाशनावर
मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप करता
येणार नाही मात्र चौकशी अंती
शहनिशा झाली तर गत चार- पाच सालापासून कामगारांच्या
वैधानिक हक्काचा व किमान वेतन कायद्याचा " कचरा" करण्यात आला असे म्हणावे लागेल.
2023- 24 पासून घनकचरा व्यवस्थापनातील सफाई कामगारांना अंदाज पत्रकानुसार मजूरी का दिली
नाही? जी मजूरी दिली ती नियमानुसार होती का? जनतेला
व विशेष करून त्यां 50 कामगारांना पारदर्शक पणे सांगण्यात का आले नाही?
2023-24 या वषाॅत अंदाजपत्रक व प़त्यक्ष सफाई कामगारांना दिलेले वेतन यात
अंदाजे 29,,24,376 रुपयाची लय भारी तफावत कशी? सदर
रक्कम गेली कुठे? कुठल्या खाती
खचॅ करण्यात आली? कंत्राटदारांस किती रक्कम मंजूर करण्यात आली? अशा अनेक प़श्नांची
सरबत्ती कामगार मंत्री यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात
आली आहे.
भा. ज. यु. मो. उपाध्यक्ष
सुरज मांदाडे यांनी निवेदनातून
2023-24 मध्ये मूल न. प. अंतगॅत 50 सफाई कामगारांची
तरतुद व प़तीदिन, प़तिमजूर मजूरी चे मूळ दर रू 363.44 अधिक विशेष भत्ता रू. 204
असल्याचे विषद केले आहे. मात्र
प़त्यक्षात मजूरांचे खात्यात रू. 380 प़तीदिन टाकण्यात आल्याची शंका उपस्थित केली आहे.
महिन्याकाठी 26 दिवसाचे काम गृहीत धरल्यास दरमहा रूपये 243698 व वषाॅकाठी ही प़त्यक्ष
तफावत र. 2924376 होत
असल्याची आकडेमोड निवेदनातून पुढे ठेवली आहे.
घनकचरा व्यवस्थापनात कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारांची बदमाशी असेल असे म्हणून चालणार नाही.प़ाप्त माहितीनुसार सदर अंदाजपत्रकात मूल शहरातील
नाल्यांची लांबी सुमारे 130 किलोमीटर असल्याचे कळते.
व ही नाली सफाई महिण्यात दोनदा करायची आहे. दोनदा सोडा एकदा तरी सफाई होते का? न. प. स्वच्छता सभापती
वा नगरसेवक यांनी लक्ष देणे गरजेचे ठरते. चौकशी न. प. ने सुद्धा करावी. कामगारांच्या वैधानिक हक्काचे हनन व किमान वेतन
कायद्याचा कचरा करण्याची यात
चालबाजी असेल तर विषय चौकशी व कायॅवाही करून संपवायला हवा असे या निवेदनानंतर जागरूक नागरिक
बोलायला लागले आहेत. 2023-24 ते 2025-26 ला काळ न. प. प़शाशकाचा होता
त्यामुळे कंत्राटी सफाई कामगारांना मागणीनुसार न्याय
मिळवून देण्यासाठी खुद्द मुख्याधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असेही बोलले जात आहे.
2026-27 चे अंदाजपत्रकात
910.18 रुपये कंत्राटी कामगारांचे दर असल्याचे व शाशकीय नियमानुसार यापुढे कामगारांना वेतन अदा करुन
कामगारांवर अन्याय होणार नाही
अशीही मागणी निवेदनातून मांदाडे यांनी केली आहे.

