डॉ. अशोक जाधव यांना 2026 चा 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर अमरावती येथील कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेकडून गौरव​

डॉ. अशोक जाधव यांना 2026 चा  'राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर 

अमरावती येथील कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेकडून गौरव
​ 
 (महेश निमसटकर 
 जिल्हा विभागीय संपादक चंद्रपूर)




भद्रावती दी 30:- ​दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना कलाजीवन बहुउद्देशीय संस्था (ढगा, जि. अमरावती) यांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी संपूर्ण देशातून सामाजिक, शैक्षणिक व बहुजन-आदिवासी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६'ने सन्मानित करण्यात आले आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम माणिकगड पहाडावरील पिटीगुडा नं. १ या बंजारा समाजाच्या गावातील सुपुत्र, 'ऑल इंडिया बंजारा टायगर्स'चे राष्ट्रीय महासचिव डॉ. अशोक दिगंबर जाधव यांना 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६'ने सन्मानित करण्यात आले आहे.
​डॉ. अशोक जाधव यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर तब्बल २३० पुरस्कार मिळाले असून, हा त्यांचा २३० वा सन्मान ठरला आहे. महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार प्राप्त ग्राम जिवन विकास संस्था चिंचाळा सचिव म्हणून कार्यरत असून तसेच महाराष्ट्र शासनाचा 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कार' प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय संस्था (पिटीगुडा नं. १, ता. जिवती) द्वारे संचलित 'श्री दिगांबर नाईक निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र' चंद्रपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया येथे सन २०१२-२०१३ पासून अल्पसंख्याक व वंचित घटकांतील तरुणांसाठी राबवले जात आहे. हे प्रशिक्षण केंद्र आजही यशस्वीपणे सुरू असून, यासोबतच वाचनालय, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा विविध सामाजिक योजना डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.
​त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया बंजारा टायगर्स, अल्पसंख्याक निवासी पोलीस भरती पूर्व संघटना महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना यांच्या वतीने त्यांचे सर्वत्र कौतुक व हार्दिक अभिनंदन केले जात आहे.
​हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता द कल्चर हॉटेल (शोरवे बस्ती, आळंदी-मरकल रोड, भारत पेट्रोल पंपाजवळ, आळंदी-चरहोली, पुणे) येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ. तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सकल ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी सुपेकर होते.
​या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराजजी राजेभोसले, बॉलीवूड अभिनेत्री रूपाली पवार, ॲड. रमेश खेमू राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका नाईक या होत्या, तर कार्यक्रमाचे आयोजन कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज ठाकरे (ढगा, ता. वरूड, जि. अमरावती) यांनी केले होते.
Previous Post Next Post