बापरे! बीडमध्ये ग्रामरोजगारसेवक 60 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला.-छत्रपती संभाजीनगर एसीबीची कारवाई..

बापरे! बीडमध्ये ग्रामरोजगारसेवक 60 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला.

-छत्रपती संभाजीनगर एसीबीची कारवाई..

(प्रशांत बाफना । बीड जिल्हा विभागीय संपादक)

दि.31 ः नरेगा योजनेअंतर्गत शेतविहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 61 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 60 हजार रुपये स्वीकारणार्‍या ग्रामरोजगार सेवकाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे बीड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शहर मार्गदर्शक आणि स्थानिक माहिती मिळवणे

मुकेश सोनाजी भोकरे (वय 47), ग्रामरोजगार सहायक, लिंबारुई, ता. बीड, असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने नरेगा योजनेअंतर्गत शेतविहिरीचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी भोकरे याने तक्रारदाराकडे 61 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने भोकरे याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत शिंगारे आणि प्रभारी उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक भास्कर नवले, अनवेज शेख, प्रकाश डोंगरदिवे आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली
Previous Post Next Post