महापालिकेचा आरोग्यसेवेत राज्यभरात डंका; ‘एमओएच’ रँकिंगमध्ये राज्यात द्वितीय क्रमांकावर

महापालिकेचा आरोग्यसेवेत राज्यभरात डंका; ‘एमओएच’ रँकिंगमध्ये राज्यात द्वितीय क्रमांकावर

(अहिल्यानगर / प्रशांत बाफना विभागीय संपादक)

अहिल्यानगर महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य सेवेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्याच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी (‘एमओएच’) रँकिंगमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राज्य कार्यालयाकडून जून २०२६ च्या पहिल्या तिमाहीसाठी जाहीर झालेल्या या क्रमवारीत राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये अहिल्यानगरने हे यश मिळवले आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्य आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते अहिल्यानगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांचा सत्कार करण्यात आला.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून विविध आरोग्य सेवा, उपक्रम आणि पोर्टलवरील मासिक नोंदींच्या आधारे दर महिन्याला महानगरपालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व सिव्हिल सर्जन यांचे स्वतंत्र रँकिंग केले जाते. यामध्ये माता व बाल आरोग्य, गरोदर मातांची नोंदणी, लसीकरण, नवजात बालकांची काळजी, कुटुंब नियोजन व नसबंदी सेवांचा सविस्तर आढावा घेतला जातो. तसेच, असंसर्गजन्य आजारांची नोंदणी व उपचार, क्षयरोग मुक्तीसाठी राबवले जाणारे अभियान, कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व आपला दवाखाना येथील ओपीडी सेवा, आणि आरोग्यवर्धिनी समित्यांच्या बैठका व त्यांचे अनुपालन या सर्व निकषांवर प्रभावी कामकाज केल्यामुळे अहिल्यानगरला हे मानांकन प्राप्त झाले आहे.

आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, शहरात आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातत्याने सूचना देऊन नवनवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमधून नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध केली जात आहे. येत्या काळात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका अधिक चांगल्या उपाययोजना राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट
Previous Post Next Post