धीरज परदेशी प्रकरणात मोठी अपडेट; आणखी पाच जण…

धीरज परदेशी प्रकरणात मोठी अपडेट; आणखी पाच जण…

(अहिल्यानगर जिल्हा विभागीय संपादक प्रशांत बाफना)

मुकुंदनगर परिसरात घडलेल्या धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्या हत्या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलिसांनी आणखी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला असून, पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी सुरू आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी इम्रान मुसा सय्यद, जाहीद नुसरत शेख, आरमान लिकायत सय्यद, हुजैफ साजिद शेख, मोहम्मद रशाद इम्रान सय्यद (सर्व रा. मुकुंदनगर) यांना ताब्यात घेतले आहे.

मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत असताना धीरज परदेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या धीरज यांचा उपचारादरम्यान 9 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलिसांनी यापूर्वी मुख्य संशयितांसह आरोपींना अटक केली आहे. मुख्य संशयितांना हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून इतरांवरही कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, आणखी पाच जणांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणात नेमकी त्यांची भूमिका काय आहे, मुख्य आरोपींशी त्यांचा संबंध आहे का आणि हल्ल्‌‍यानंतर आरोपींना पळून जाण्यास अथवा लपण्यास त्यांनी मदत केली का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. या कारवाईनंतर धीरज परदेशी हत्या प्रकरणातील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते आणि आणखी कोणावर कारवाई होते, याकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे
Previous Post Next Post