भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन यशस्वी
विविध उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
भंडारा:- भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशाच्या वतीने इ पी एस पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी तसेच ई एस आय सी ची मर्यादा वाढविण्यात यावी बोनसची मर्यादा वाढवण्यात यावी, किमान वेतन वाढविण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२६ ला कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले असून विदर्भासह भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील विविध उद्योगातील अनेक कामगारांचे प्रमुख प्रश्न राज्य शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने सदर प्रश्नावर स्मरण करून देण्याकरिता सोमवार ला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रलंबित कामगार प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले आहे.
या प्रलंबित कामगार रस्ता बाबत भारतीय मजदूर संघास विश्वासात घेऊन कामगारांना न्याय द्यावे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल मागील अनेक वर्षांपासून बंद असून अनेक कर्मचाऱ्यांचा रोजगार गेल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तात्काळ फिनले मिल सुरु करण्यात यावी किंवा कर्मचाऱ्यांना पूर्ण नोकरीचा आर्थिक मोबदला प्रदान करण्यात यावा. महिला आर्थिक विकास मंडळा च्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाकरिता तसेच महिला बचत गटा करिता कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रतिसिएमआरसी १५ लक्ष रुपये आस्थापना खर्च म्हणून देण्यात यावे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील राईस मिल मधील कर्मचाऱ्यांना किमान वेतन व ८ तास ड्युटी देण्यात यावी. भंडारा -गोंदिया मंडळातील माथाडी मंडळाची रखडलेली नोंदणी तात्काळ सुरु करण्यात यावी. विदर्भातील सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांना चालू असलेल्या वेतन करारात किमान वेतन वाढ ६००० रुपये देण्यात यावी. म्युर मेमोरियल हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा मागील ३६ महिन्याचा थकीत पगार व रिटायरमेंट चे पैसे तात्काळ देण्यात यावे. गट सचिव कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यात यावे. फॉरेस्ट गाईड कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात यावे. कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या न्याहक्काच्या मागण्यांना तात्काळ न्याय द्यावा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरील शासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत असलेला अन्याय दूर करून शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे. वीज कर्मचारी महासंघाच्या व विज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याप्रलंबित प्रश्नावर तात्काळ चर्चा करण्यात यावी. नगर परिषद, नगर पंचायत मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वेतन देण्यात यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर व विदर्भातील विविध शासकीय रुग्णालयात कोरोना काळात दहा वर्षापेक्षा जास्त नोकरी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्यात यावे. नागपूर येथील मध्य रेल्वेच्या स्टेशनवर ऑटो चालकांना स्टॅन्ड उपलब्ध करून द्यावे. राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम मंडळातील नोंदणी पारदर्शकपणे करण्यात यावी. मेट्रो रेल्वेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ज्येष्ठतेनुसार वाढ देण्यात यावी. अशाप्रकारे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन दरम्यान जिल्ह्यातील १०० च्या वर भारतीय मजदूर संघ, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, आयुध निर्माण, बीडीसीसी बॅंकेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिष्टमंडळाच्या वतीने भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र लिल्हारे, जिल्हा मंत्री पन्नात्ताल उपवंशी, उपाध्यक्ष नत्थुजी शेंडे, सचिन गोन्नाडे, आयुध निर्माण संघाचे राजेश बिसेन, सुरक्षारक्षक अमित वासनिक, विलास माकडे, सफाई कर्मचारी योगेश मडावी, संतोष सानेवाने, सुनिल मोहनकर, उमेश कडव, सुरेन्द्र टिचकुले, खेमदेव हटवार इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधींनी निवेदन दिले.

