अहिल्यानगरचे 'डॅशिंग' एसपी मुम्मका सुदर्शन सर...!निदान तुम्ही तरी न्याय मिळवून द्याल का हो आर्थिकदृष्ट्या फसलेल्या 'या' तरुणाला...?नेवासा पोलीस भेंड्याच्या या तरुणाची कैफियत ऐकायला तयारच नाहीत...!

अहिल्यानगरचे 'डॅशिंग' एसपी मुम्मका सुदर्शन सर...!

निदान तुम्ही तरी न्याय मिळवून द्याल का हो आर्थिकदृष्ट्या फसलेल्या 'या' तरुणाला...?

नेवासा पोलीस भेंड्याच्या या तरुणाची कैफियत ऐकायला तयारच नाहीत...! 


(स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना विभागीय संपादक)


गेल्या पाच महिन्यांपासून पुणे आणि नेवासा पोलिसांकडे 'तो' सातत्यानं चकरा मारतो आहे. पण पोलीस त्याला न्याय मिळवून देण्यात कुठलंही स्वारस्य दाखवत नाहीत. नेवासे तालुक्यातल्या या तरुणाचं नाव संदीप राजेंद्र धाकतोडे असून याच तालुक्यातल्या भेंडा या गावात राहणाऱ्या या तरुणाला पुणे जिल्ह्यातल्या धानोरीच्या अनुराधा चंद्रशेखर लोधी आणि सुमेर चंद्रशेखर लोधी या दोघांनी लाखो रुपयांना गंडवलं आहे. आयकर विभागात 'टॅक्स असिस्टंट' या पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत या दोघांनी संदीप धाकतोडे या तरुणाची आर्थिक फसवणूक केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या संदर्भात धाकतोडे या तरुणानं पुण्याचे पोलीस आयुक्त तसेच नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज ही दिलेला आहे. या तक्रार अर्जानुसार अनुराधा लोधी आणि समीर लोधी या दोघांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी या तरुणाची अपेक्षा आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या तरुणाला न्याय मिळत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे 'डॅशिंग' एसपी मुम्मका सुदर्शन सर यांना जाहीरपणे विचारावं असं वाटतं, की आर्थिकदृष्ट्या फसलेल्या 'या' तरुणाला
निदान तुम्ही तरी न्याय मिळवून द्याल का? कारण नेवासा पोलीस या तरुणाची कैफियत ऐकायला तयारच नाहीत.


यासंदर्भात संदीप धाकतोडे या तरुणाने सांगितलं, की त्याचा आणि अनुराधा लोधी तसंच सुमेर लोधी आपसात नोकरी लावून देण्यासंदर्भात आर्थिक व्यवहार झालेला आहे. त्याची सविस्तर माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना देण्यात आली आहे. धाकतोडे यांच्या एकून 8 लाख 40 हजार रुपये या रक्कमेपैकी 3 लाख 65 हजार रुपये इतकी रक्कम धाकतोडे यांना तृतीय पक्षकार बाबुराव मदने यांच्याकडून मिळाली आहे. उर्वरित रक्कम 4 लाख 75 हजार रुपये धाकतोडे यांना अनुराधा लोधी यांनी द्यायचं कबूल केलं आहे. 

दरम्यान, कृष्णा वसंत गावडे (मूळ रा. कोल्हापूर गाव भोगोली) यांच्यासह आणखी 5 ते 7 जणांनी पुणे येथून सरकारी विभागाच्या (रेल्वे, आयकर, पोलीस, CET, TET) अशा खोट्या नोकर भरतीच्या नावाने बनावट कागदपत्रं दाखववून महाराष्ट आणि बाहेरील किमान 40 मुलांना नोकरीचं आमिष दाखवत करोडो रुपयांना गंडा घातलेला आहे. कृष्णा वसंत गावडे हे आपण स्वतः PSI असं सांगत आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो, आपली अकॅडमी आहे आणि मी लावलेले खूप लोक आज सरकारी कामे करत आहेत, असं भासावत आहे.

कृष्णा गावडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताला धरुन काही मुलांची भरतीदेखील करुन घेतली आहे. त्याचीही चौकशी करायची आहे. नुकत्याच झालेल्या CET, TET परीक्षेमध्ये देखील गालडे यांनी काही मुलांना समाविष्ट केलं आहे. MIDC च्या भरतीमध्येदेखील गावडे यांनी काही मुलांना बसवलं आहे. अनुराधा लोधी यांनी नोकरी लावून देण्यासाठी संदीप धाकतोडे यांच्याकडे नऊ लाख रुपयांची मागणी केल्याचं धाकतोडे यांचं म्हणणं आहे. या नऊ लाख रुपयांपैकी धाकतोडे यांनी सहा लाख रुपये अनुराधा लोधी यांचा मुलगा सुमेर लोधी यांच्या 'फोन पे'वर तर अनुराधा लोधी यांना दोन लाख चाळीस हजार रुपये दिले आहेत. त्यानंतर संदीप धाकतोडे यांच्याकडून वारंवार विनंती करण्यात आल्यानंतर बाबुराव कृष्णा मदने यांनी धाकतोडे यांना तीन लाख पासष्ट हजार रुपये उसने दिले असल्याचं धाकतोडे यांनी सांगितलंय. 

काही दिवसांनी संदीप धाकतोडे यांनी त्यांच्या पत्नीसमवेत पुण्याचे पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता अनुराधा चंद्रशेखर लोधी यांनी धाकतोडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करत मारहाण करण्यासाठी मारेकरी पाठविल्याचा गंभीर आरोप धाकतोडे यांनी केला असून अनुराधा लोधी यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना लेखी पत्राद्वारे असं सांगितलं, की संदीप धाकतोडे यांचे सर्व पैसे आपण दिनांक ४.३.२०२६ पर्यंत देणार आहोत. परंतू अनुराधा लोधी यांनी आतापर्यंत आपले पैसे दिले नाहीत, असं धाकतोडे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी धाकतोडे यांच्याकडूनही एक पत्र लिहून घेतलं असून लोधी यांनी पैसे दिले नाहीत तर धाकतोडे यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात लोधी यांच्याविरुद्ध तक्रार द्यावी. जी मदत लागेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत, अशी ग्वाहीदेखील पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली असल्याचं संदीप धाकतोडे यांनी सांगितलं आहे
Previous Post Next Post