शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी तुकाराम वडघणे, व्हाईस चेअरमनपदी अरुण ढाकणे; मान्यवरांच्या हस्ते सत्कार

शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी तुकाराम वडघणे, व्हाईस चेअरमनपदी अरुण ढाकणे; मान्यवरांच्या हस्ते सत्कार

(अहिल्यानगर जिल्हा विभागीय संपादक (प्रशांत बाफना):

 शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी  तुकाराम शिवराम वडघणे तर व्हाईस चेअरमनपदी  अरुण बलभिम ढाकणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  माजी आ नरेंद्र घुले पाटील, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि माजी सभापती क्षितिज घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
निवडीनंतर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुकाध्यक्ष कैलासराव नेमाणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन तुकाराम वडघणे व व्हाईस चेअरमन अरुण ढाकणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नानापाटील मडके, हनुमान पातकळ, एकनाथ कसाळ, अशोकराव धस, भारतराव मोरे, भास्करराव खेडकर, बाळासाहेब विघ्ने, भारतराव मोटकर, संतोष पावसे, शाहादेव खोसे, रवींद्र भरत, बाबासाहेब दिवटे, ज्ञानदेव पोपळे, एकनाथ मोरे, सुरेश मडके, महादेव मगरे, प्रल्हाद देशमुख, पंडितराव गायके, संजय नांगरे, सचिनराव फटांगरे, तुळशीराम खताळ, विलासराव लोखंडे, बाळासाहेब ढाकणे, आप्पासाहेब भुजबळ यांच्यासह संघाचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी संघाने शेतकरी हिताला प्राधान्य देत पारदर्शक व विकासाभिमुख कामकाज करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित चेअरमन तुकाराम वडघणे आणि व्हाईस चेअरमन अरुण ढाकणे यांनी संघाच्या प्रगतीसाठी सर्व संचालक व सभासदांना विश्वासात घेऊन काम करण्याची तसेच शेतकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेण्याची ग्वाही दिली
Previous Post Next Post