देऊळगाव ग्रामपंचायतीतील मासिक सभांवर प्रश्नचिन्ह; खोटे ठराव व बनावट दस्तऐवजांच्या आरोपांची चौकशी रखडली..
(चौकट) पंचायत राज समिती आज सदर चौकशीवर गांभीर्यपूर्ण लक्ष घालून चौकशी नुसार कारवाई करेल काय..
तालुक्यातील देऊळगाव ग्रामपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; सदस्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार..
(तालुका प्रतिनिधी पातूर दुल्हे खान)
देऊळगाव : ग्रामपंचायत येथे सन 2023-24 व 2024-25 या कालावधीत नियमित मासिक सभा न घेता परस्पर खोटे ठराव तयार करून शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत प्रशासक सदस्य शंकर शिवहरी बदरखे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पातूर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, ग्रामपंच अधिनियम 1961 नुसार घेण्यात येणाऱ्या मासिक सभा प्रत्यक्षात झाल्या नसतानाही सभांचे रजिस्टर व ठराव तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांच्या खोट्या सह्या करून प्रोसिडिंग बुक तयार करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दस्तऐवजांच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांना मासिक सभा झाल्याचे भासवून शासनाची व ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे अभिलेख तपासून असा निष्कर्ष दिला आहे की मासिक सभा घेण्यात आलेल्या नाहीत आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही या प्रकरणाची सखोल चौकशी व पुढील कारवाई अद्याप झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणात लाखो रुपयांचा शासकीय निधी संबंधित कामांसाठी काढण्यात आल्याचा आरोप असून, प्रत्यक्ष कामे, ठराव व निधी खर्च यांची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बनावट दस्तऐवज व खोट्या सह्यांबाबत तक्रारदाराने पातूर पोलीस ठाण्यातही लेखी तक्रार दिल्याचे समोर आले आहे.
चौकशी अहवालातच मासिक सभा न झाल्याचे स्पष्ट झाले असल्यास संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणार का, याकडे देऊळगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. //सन 23 24 24 25 या वर्षांमध्ये मासिक सभा घेतल्या नाहीत त्याची चौकशी गटविकास अधिकारी यांनी केली त्यामध्ये मासिक सभा न झाल्याचे दिसून आले मात्र सचिव यांनी खोटे दस्ताऐवज तयार केले त्यामध्ये जवळपास 40 लाखचा अपार केल्याचा गट विकास अधिकारी यांच्या तपासणी नुसार स्पष्ट होते ग्रामपंचायत प्रशासक सदस्य शंकर शिवहरी बदरखे देऊळगाव. //नियमानुसार कार्यवाही करू प्रशांत सोळंके विस्तार अधिकारी पंचायत समिती पातुर//

