पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघालेला ओबीसी मोर्चा स्थगित ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्णय.

पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघालेला ओबीसी मोर्चा स्थगित ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्णय.

पुणे : /प्रशांत बाफना 

मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू असतानाच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघटना देखील आक्रमक झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोर्चा काढला. लक्ष्मण हाके यांचा मुंबईकडे निघालेला मोर्चा स्थगित झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठकीचं अश्वासन मिळाल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करणार असा इशारा हाके यांनी दिला आहे.


ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी हाके यांच्या नेतृत्वात ओबीसींचा हा महाएल्गार मोर्चा शकाढण्यात आला होता. मात्र, सरकारकडून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीच्या आश्वासनांनंत हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी दाखल्यांच्या मागणीला आव्हान देण्यासाठी लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाच्या ओबीसी महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वातील या मोर्चाने मुंबईकडे कूच केली होती. पोलिसांनी परवानगी नाकारली, काही ठिकाणी अडवण्यात आला मात्र मोर्चा काढण्यावर हाके ठाम राहिले आणि त्यांनी मुंबईकडे कुच कायम ठेवली होती. 


ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे चलो मुंबई आंदोलन मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीच्या अश्वासनानंतर तात्पुरतं स्थगित झाले आहे. गणपतीनंतर हाके यांच्याशी सरकार थेट वन टू वन चर्चा करपणार आहे. या आंदोलनातून आम्हाला फक्त 4 टक्के यश मिळाल्याचं प्रांजळपणे हाकेंनी कबुल केले. आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षणासंदर्भात्र गेल्या वर्षी 2 सप्टेंबरला काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली.. सरकार एकीकडे जरांगेशी चर्चा करण्यासाठी दररोज तीन-तीन मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवतंय. मात्र दुसरीकडे हाकेंच्या आंदोलनाची साधी दखलही घेतली जात नसल्याची नाराजी ओबीसी नेते हाकेंनी व्यक्त केली. 


प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासोबत इतर ओबीसी नेते येवोत न येवोत पण मी मात्र. शेवटपर्यंत हाके यांची साथ देणार असल्याचं बळीराम कटके यांनी म्हटलंय दिड दोन वर्षापूर्वी प्रा. लक्ष्मण हाके याचं वडीगोद्रीचं आंदोलन उभं केलं होतं. हाके यांच्या आंदोलनावर टीका करणार्‍या नवनाथ वाघमार यांचाही कटके यांनी यरपूस समाचार घेतला. सरकारने आम्हाला आझाद मैदानावर बसू दिलं नाहीतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच जाऊन आंदोलन करू, असा इशाराही बळीराम कटके यांनी दिला
Previous Post Next Post