नॉट मी बट यु चा संदेश देत राजश्री शाहू महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा..

नॉट मी बट यु चा संदेश देत राजश्री शाहू महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा..


(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे असणाऱ्या राजश्री शाहू महाराज महाविद्यालय येथे गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय सेवा योजना ( N S. S )च्या स्थापनादिन महाविद्यालयामध्ये उत्साहात पार पडला समाजसेवा नेतृत्व राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.स्वाती हापसे ह्या होत्या यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अनिल शिंदे यांच्यासह प्रा .रवींद्र पाटील प्रा .दादा बंडगर अश्विनी चांगडे प्रा .रागिनी टेकाळे प्रा .महेश निंबाळकर तसेच कार्यालयीन अधीक्षक संजय कदम कार्यक्रमास उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा .डॉ .संदीप येरोळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या नॉट मी बट यू या ब्रीद वाक्याचा अर्थ स्पष्ट करत म्हटले की समाजसेवा ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विकासाची प्रभावी चळवळ असल्याने स्वच्छता अभियान वृक्षरोपण रक्तदान जनजागृती व्यसनमुक्ती ग्रामविकास पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांनी समाजप्रती असलेली जबाबदारी आपल्या कृतीतून सिद्ध करावी असे आव्हान त्यांनी केले यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .अनिल चिंधे यांनी कार्यक्रमास प्रमुख वक्ते असलेले डॉक्टर संदीप येरोळे यांचा परिचय करून दिला अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य सौ.प्रा .स्वाती हापसे यांनी विद्यार्थ्यांनी समाजसेवा ही केवळ उपक्रमापूर्ती मर्यादित न ठेवता ती जीवनमूल्य म्हणून स्वीकारावी असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी पुंड येणे केले तर आभार परीक्षा अधिकारी प्रा .दादा बंडगर यांनी केले कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली .
Previous Post Next Post