झाडाची फांदी कोसळून जिवती कृषी विभागाच्या इमारतीचे नुकसान.‘बोल भाऊ शेतकरी’च्या माध्यमातून पाहणी; नवीन इमारतीत तात्पुरते कामकाज सुरू करण्याची मागणी.

झाडाची फांदी कोसळून जिवती कृषी विभागाच्या इमारतीचे नुकसान.

‘बोल भाऊ शेतकरी’च्या माध्यमातून पाहणी; नवीन इमारतीत तात्पुरते कामकाज सुरू करण्याची मागणी.

महेश निमसटकर 
 ज़िल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर 




भद्रावती दी.26: जिवती तालुक्यातील कृषी विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीवर मोठ्या झाडाची फांदी कोसळल्याने इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे कार्यालयातील सिमेंटच्या पत्र्यांसह इमारतीच्या काही भागाचे नुकसान झाल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ‘बोल भाऊ शेतकरी’ या YouTube माध्यमाच्या वतीने अरविंद चव्हाण यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याकडून घटनेची माहिती घेण्यात आली तसेच इमारतीची सविस्तर पाहणी करण्यात आली.

कार्यालयाच्या इमारतीचे नुकसान झाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विभाग असल्याने शेतकऱ्यांची कामे, पीकविषयक मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांचे कामकाज सुरळीत राहणे आवश्यक आहे.

त्यामुळे ‘बोल भाऊ शेतकरी’च्या माध्यमातून संबंधित प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, कृषी विभागासाठी उपलब्ध असलेल्या शेजारील दुसऱ्या इमारतीमध्ये सध्या तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात यावे. तसेच त्या इमारतीमध्ये आवश्यक विद्युत (लाईट) सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी.

नुकसान झालेल्या इमारतीची आवश्यक ती दुरुस्ती किंवा नवीन इमारतीबाबत प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सेवांचा कोणताही त्रास होऊ नये आणि कार्यालयीन कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

— अरविंद चव्हाण 
शिवसेना जिल्हा सोशल मीडिया समन्वयक, राजुरा-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र
‘बोल भाऊ शेतकरी’
Previous Post Next Post