जरांगे पाटीलांची प्रकृती खालवली; राज्यभरात तीव्र पडसाद मराठा आंदोलक आक्रमक; ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने, बंदचे आवाहन

जरांगे पाटीलांची प्रकृती खालवली; राज्यभरात तीव्र पडसाद मराठा आंदोलक आक्रमक; ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने, बंदचे आवाहन

बीड/प्रशांत बाफना:

 मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी आलेले सरकारचे शिष्ठमंडळ संभाजीनगरमध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठाक आणि पत्रकार परिषदेतून जरांगे पाटलांकडून सकारात्मक भूमिकेची अपेक्षा व्यक्त करत आहे. मात्र, जरांगे पाटील मागण्यांच्या आंमलबजावणीवर ठाम असल्याने सरकारच्या शिष्ठमंडळाने अद्याप आंतरवालीकडे जाण्याची तसदी घेतली नाही. एकीकडे जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असली तरी दूसरीकडे मात्र सरकारचे शिष्ठमंडळ संभाजीनगनरमध्ये येऊनही वेळकाढूपणा करत असल्याच्या भावना मराठा आंदोलकांमधून उमठत आहेत. याचे पडसाद बुधवारी (दि. 2) राज्यभरात उमठले. आक्रमक आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शनं,ठिय्या आंदोलन केले. 


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे (दि.29 ऑगस्ट) पासून बेमुदत उपोषण सुरू आहे. बुधवारी (दि.2 सप्टेंबर) आंदोलनाचा पाचवा दिवस. सोमवार (दि.31) पासूनच जरांगे यांची प्रकृती खालवत चालली आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शुगर लेवल कमी होवून त्यांना उलट्यांचा त्रास झाला. आंदोनस्थळी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या हजारो समर्थकांनी सरकारला तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. मंगळवारी (दि.1) सरकारचे शिष्ठमंडळ संभाजीनगर मध्ये दाखल झाले. जालनाचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्यामार्फत जरांगे पाटील यांच्याकडे शिष्ठमंडळाने मसूदा पाठवला. जरांगे पाटील यांनी अधिकार्‍यांना आंमलबजावणीचे जीआर पाहिजेत म्हणत हा विषय तुमच्या अख्त्यारित नसून तुम्ही यात मध्यस्थी करू नका. शिष्ठमंडळाने मागण्यांचे जीआर घेवून यावं अशी भूमिका घेतली. 


जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही चर्चेसाठी आलेले सरकारचे शिष्ठमंडळ संंभाजीनगरहून आंतरवालीकडे का येत नाही? असा प्रश्न उपस्थिीत करत शिष्ठमंडळाने तात्काळ आंतरवाली यावं या मागणीसाठी बुधवारी (दि.2) सकाळी वडीगोद्री येथे धुळे- सोलापूर महामार्गावर अचानक रास्तारोको सुरू केला. पोलिस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, आंदोलक मागण्यांवर ठाम होते. रास्तारोकोमुळे वाहनांच्या दहा किलोमिटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. अखेर दोन तासांनंतर जरांगे पाटील यांचे सहकारी व आंतरवालीचे सरपंच पांडूरंग तारक आंदोलनस्थळी आले आणि आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर दुपारी 12: 00 वाजताच्या दरम्यान वाहतूक सुरळीत झाली. 


सायंकाळी शिष्ठमंडळाच्या पत्रकार परिषदे नंतर मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले. महाकाळा (ता. आंबड) येथे समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात धुळे- सोलापूर मार्गावर रास्तारोको सुरू केला. हजारो आंदोलकांनी अचानाक महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक खोळंबली. शिष्ठमंडळ आंतरवालीत दाखल झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा घेत आंदोलकांनी वाहनांवर चढून प्रचंड घोषणाबजी केली. जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी सायंकाळी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी काळकुटे यांना आमदार प्रसाद लाड यांचा फोन आला. काळकुटे यांनी त्यांच्यातील संवाद ओपन सांऊंड करून आंदोलकांना ऐकवला.


पुण्यातील कात्राज चौकात सकल मराठा समाजा आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले‘ एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबजी करत आंदोलकांनी पुणे-सातारा महामार्ग अडवून धरला. या आंदोलनामुळे शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक खोळंबली. अंतर्गत रस्त्यांवरही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 


मराठवाड्यात उद्या जिल्हा बंदची हाक: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या मराठवाड्यात जिल्हाबंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांची दखल घेवून सरकारने तात्काळ तोडगा काढावा या मागण्यांसाठी बंदची हाक देण्यात आली आहे. बीडमध्ये व्यापारी महासंघाने बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शवला आहे. 


मागण्यांचा जीआर आणा, तरच या: सरकारला कित्तेकवेळा लेखी स्वरुपात मागण्या दिल्या आहेत. चौदा मागण्यांचा मसूदा पाठवला पण त्याची मला आंमलबजावली पाहिजे, सगळ्यात चालबाज विखे पाटील आहे. “नवरा मेला तरी चालेल ,पण सवत रंडकी झाली पाहिजे” अशी त्यांची भूमिका दिसते. सातारा संस्थान कोल्हापूर संस्थान गॅझेट चा जीआरा काढा, हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र वाटप करा हे गेल्या वर्षभरापासून आम्ही म्हणत आहोत, मंत्रालय स्थापन करत नाहीत.

मला मसूदा वाचता येत नाही, तुम्ही माणसं बेशुद्ध पडल्यावर येता हैदराबाद गॅझेटनुसर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप गेल्या वर्षभरापासून केलं नाही, सातारा, कोल्हापूर गॅझेटसाठी मागिल वर्षी महिनाभराची वेळ मागतली होती. वर्ष होवूनही अद्याप आंमलबजाणी नाही. मागण्यांचा जीआर घेउन या असं म्हणत जरांगे पाटील यांनी शिष्ठमंडळाला सुनावाले. 


जरांगे पाटलांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा: शिष्ठमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांनी संभाजीनगरच्या विभागी आयुक्त कार्यालयामध्ये अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये जरांगे पाटील यांना त्यांच्या मागण्यांचा मसूदा पाठवला आहे. अद्यापर्यंत आम्हला त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद आलेला नाही. अपेक्षा आहे त्यांनी तो मसूदा वाचून त्यातील काही बारकावे, उनिवांबाबत कळवावे, आम्हाला जरांगे पाटील यांच्याकडून सकारात्मकतेची अपेक्षा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं
Previous Post Next Post