पत्रकार साईनाथ शिरोळे यांची देशोन्नती बिलोली तालुका प्रतिनिधी पदी निवड
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील युवा, सामाजिक, राजकीय, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच शासकीय क्षेत्रातील विविध प्रश्नांना आपल्या लेखणीतून, वाचा फोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बिलोली तालुका देशोन्नती प्रतिनिधी पत्रकार साईनाथ भाऊ शिरोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पत्रकार, साईनाथ शिरोळे उत्कृष्ट लेखणी व लेखणीच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज, उठवण्याचा काम करत आले आहेत, त्यांनी आजपर्यंत देशोन्नती बिलोली शहर प्रतिनिधी म्हणून शहरातील विविध, कार्यक्रम व शहरातील, नागरिकांच्या समक्षेचे निराकरण करण्यासाठी, शासकीय स्तरावरती आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासकीय,कर्मचारी यांना नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी भाग पाडले आहे. बिलोली शहरातील शेतकरी असो सामान्य नागरिक असो, यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये बिलोली शहर प्रतिनिधी म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे,व दि 28/08/2026 रोजी,ज्येष्ठ पत्रकार कै.बाबुराव इंगळे यांच दुःखद निधन झाले त्यांनी तालुका प्रतिनिधी पदी उत्कृष्ट अशी लेखणीच्या माध्यमातून तालुक्याचे नेतृत्व केले आहे,व त्यांच्या दुःखद निधनानंतर देशोन्नती कार्यकारी संपादक मंडळांनी बिलोली तालुक्यात प्रतिनिधी साठी खंबीर असं नेतृत्व निर्भिड पत्रकाराचा त्यांनी शोध घेतला,त्यात पत्रकार साईनाथ भाऊ शिरोळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची
दैनिक देशोन्नतीचे बिलोली तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली,असून, सर्वसामान्य नागरिकांवर होणारे अन्याय, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या समस्या, व्यापारी वर्गाच्या अडचणी तसेच प्रशासनाशी संबंधित प्रश्न निर्भीडपणे समाजासमोर मांडण्याचे, त्यांचे कार्य आहे पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून,देण्याचे प्रभावी माध्यम आहे. ही भूमिका लक्षात घेऊन साईनाथ शिरोळे आगामी काळात बिलोली तालुक्यातील विविध प्रश्नांना आपल्या,लेखणीतून वाचा फोडतील त्यांच्या या नव्या जबाबदारीबद्दल बिलोली तालुक्यातील, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

