हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ -दोन लाखाची मागणी पतीसह पाच जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल..

हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ -दोन लाखाची मागणी पतीसह पाच जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल..


(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )


नवीन घर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करून विवाहितेला शिवीगाळ मारहाण व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी संगीता अभय माळी वय 23 वर्ष राहणार गुहा ता .राहुरी सध्या राहणार वाघाचा आखाडा ता.राहुरी यांनी फिर्याद दिली आहे .
संगीता यांचे अभय विलास माळी यांच्यासोबत दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी टाकळीभान ता .श्रीरामपूर येथील मंदिरात विवाह झाला त्यानंतर दिनांक 14 मे 2025 रोजी अहिल्यानगर येथील न्यायालयात दोघांनी कोर्ट मॅरेज केले अभयच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नसल्याने सुरुवातीला दोघे काही काळ पुणे येथे अभय याच्या चुलत भावाकडे राहिले त्यानंतर वाघाचा आखाडा येथे भाड्याची खोली घेऊन ते राहू लागले वाघाचा आखाडा येथे राहत असताना पती अभय माळी हा घरगुती कारणावरून दारू पिऊन शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असे त्यानंतर नवीन घर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करण्यात आली मात्र आईची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने एवढे पैसे देणे शक्य नसल्याने सांगितल्यावर पतीने शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली .
त्यानंतर सासरे विलास मोहन माळी सासू कमल विलास माळी भाया विशाल विलास माळी आणि चुलत सासरा अंकुश माळी हे घरी आले असता त्यांनीही नवीन घर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केल्याने तसेच पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर शिवीगाळ व मारण केली दिनांक चार डिसेंबर 2025 रोजी संगीता यांना मुलगी झाली त्यानंतरही सासू-सासरे भाया चुलत सासरा हे अधून मधून घरी येऊन किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मानसिक त्रास देत आहे तसेच ते निघून गेल्यावर पती अभय हे उपाशी ठेवून शारीरिक त्रास देत असे .
दरम्यान पती अभय येणे दारू पिऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे तसेच घरातील पेटीत ठेवलेले आई व आजीने थोडे थोडे करून दिलेले मिळून सुमारे 60 हजार रुपये आणि इतर माझी महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तो निघून गेला दिनांक 5 मे 2026 रोजी संगीता या आपल्या आईच्या घरी राहण्यासाठी गेल्या या प्रकरणी संगीता अभय माळी यांच्या फिर्यादी वरून पती अभय विलास माळी सासरे विलास मोहन माळी सासू कमल विलास माळी भाया विशाल विलास माळी चुलत सासरा अंकुश माळी सर्व राहणार गुहा ता .राहुरी यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १११३ / २०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ , ११५ ( २ ) ३५१ ( २ ) 352 व 3 ( ५ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत
Previous Post Next Post