शिक्षणप्रेमी समाजसेवक ग्राम स्वच्छतेसाठी आयुष्यभर झटणारे माधवराव पाटील शेळगावकर यांचे दुःखद निधन..

शिक्षणप्रेमी समाजसेवक ग्राम स्वच्छतेसाठी आयुष्यभर झटणारे माधवराव पाटील शेळगावकर यांचे दुःखद निधन..

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : माझं गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझा महाराष्ट्र स्वच्छ व सुंदर निर्मळ झाला पाहिजे,शिक्षण हे घरोघरी पोहोचले पाहिजे,असे पूर्ण आयुष्य लोकांसाठी वाहणारे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे महाराष्ट्राचे प्रथम,अध्यक्ष तथा शेळगाव गौरी येथील ज्येष्ठ समाजसेवक माधवराव पाटील शेळगावकर यांच दुःखद निधन झाले 
ग्रामस्वच्छता, सामाजिक समता, बंधुता आणि सामान्य माणसाच्या सन्मानासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. महाराष्ट्रासह देशातील दोन हजारांहून अधिक गावांमध्ये स्वच्छतेचा जागर करून त्यांनी समाजप्रबोधनाची अमूल्य चळवळ उभी केली. त्यांच्या कार्याने शेळगाव गौरीसह नायगाव तालुका आणि नांदेड जिल्ह्याचा गौरव वाढविला.संपत्तीपेक्षा वैचारिक,सुसंस्कृत संतती त्यांनी घडवली.
चारित्र्यसंपन्न, विचारवंत आणि समाजसेवेचा वसा या महान भूमीपुत्राच्या निधनाने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. माधवराव पाटील शेळगावकर यांना महाराष्ट्रातील, व जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व पक्षाचे नेते व सामान्य नागरिकाकडून,भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केल्या जात असून जड अंतकरणांनी एक स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र निर्माण करणारा योद्धा हरपल्याची, दुःख व्यक्त करत आहेत शेतकरी,शेतमजूर,दिनदलित, कामगार,सर्व भाऊ भाऊ एक सन्मानाने,प्रतिष्ठानने जगले पाहिजे अशी त्यांचे विचार होते, छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांनी माधव पाटील शेळगावकर हे आंबेडकरी विचार व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन,संत गाडगेबाबा महाराज यांच्या ग्राम स्वच्छता अभियान हा राबवण्याचे त्यांनी यशस्वी समाजसेवा,व शिक्षण देण्याचे कार्य केले त्यांच्या, अंत्यविधी स्वच्छ शेळगाव गौरी ता नायगाव येथे सायंकाळी पाच वाजता सर्व नातेवाईक,सामाजिक कार्यकर्ते, व सर्व शिक्षण प्रेमी सर्व जनतेच्या उपस्थित पार पडला,माधवराव पाटील शेळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Previous Post Next Post