स्वतंत्र विदर्भासाठी नागपूर कराराची होळी...
महेश निमसटकर
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
भद्रावती दी.1:चिमूर :-स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य समिती व शेतकरी संघटनांच्या वतीने चिमूर येथे नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
यावेळी शेतकरी,बेरोजगार व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.शेतकऱ्यांची कर्जमाफी,थकीत कर्जाचा प्रश्न,सातबारा कोरा करणे तसेच विदर्भाच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनात डॉ.रमेश गजभे,प्रशांत डवले,डॉ.दिलीप शिवरकर,इंजिनियर अजिंक्य ईसनकर,जितेंद्र ईसनकर,शंकर दीडमुठे,वासुदेव श्रीरामे,डॉ. पाटील,जगदीश सहारे,प्रिती दीडमुठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

