मुखेड येथे चांडोळा सर्कल मध्ये दीवाळीचा शिधा वाटप शिवसेना उपजिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर हस्ते ..
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा दिवाळीचा शिधा थेट गोरगरिबांच्या दारात.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :मुखेड तालुक्यातील चांडोळा सर्कल मध्ये नंदगाव,धामणगाव,हंगरगा खतगाव या गावातील गोरगरीब कष्टकरी जनतेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या मदतीचा धोरण..,हेच शिवसेनेचे तोरण.., मदतीचा हात..,एकनाथ,या कार्यक्रमांतर्गत गोरगरिबांना धान्य किटचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे खाजगी सचिव तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक बालाजी पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व्यंकटरावजी पाटील खतगावकर हस्ते करण्यात आले.
राज्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी, या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथरावजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून दिवाळीचा शिधा वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे खाजगी सचिव तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक बालाजी पाटील खतगावकर यांच्या हस्ते दिनांक 7 नोव्हेंबर रोजी शिवसेना संपर्क कार्यालयात मुखेड येथे संपन्न झाले होते.राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी मदतीच धोरण, हेच शिवसेनेच तोरण,मदतीचा हात...एकनाथ ही संकल्पना राबित गोरगरिबांच्या घरात आनंदाचा दिवा प्रज्वलित व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत दिवाळीसाठी आवश्यक शिध्याचे पॅकेट तयार करून शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते थेट गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत 15 नोव्हेंबर रोजी मुखेड तालुक्यातील चांडोळा सर्कल मध्ये धान्य किटचे वाटपाला सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमाचा लाभ प्रत्येक पात्र गरजू कुटुंबापर्यंत पोहोचावा,यासाठी बालाजी पाटील खतगावकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन दिवाळीचा शिधा तसेच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभेच्छा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले दुष्काळाच्या सावटातही गोरगरिबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची शिवसेनेची भूमिका यातून अधोरेखित होत आहे या शिधा वाटप शुभारंभप्रसंगी शिवसेना मुखेड तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर,नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा युवा उद्योजक कृष्णा देबडवार,प्रभाकर पाटील तांदळीकर,युवासेना तालुकाप्रमुख गजानन पाटील साखरे,किरण पाटील धामणगावकर, विकास पाटील ताटे,जावेद बेग,ओम पाटील हंगरगेकर, रियाज पटेल, अविनाश पाटील ताटे,जयवंत पाटील तरंगे,विश्वा गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

