विदर्भातील वाघांचे मराठवाड्यात स्थलांतर...!
बीड/प्रशांत बाफना
विदर्भातील टिपेश्वर वन्यजीव अभय अरण्यातून मराठवाड्यात होणारं वाघांचं स्थलांतर कायमचं आहे. अलिकडेच टिपेश्वर वन्यजीव अभय अरण्यातून (यवतमाळ) मराठवाडा धाराशिव जिल्ह्यातील येडशीमध्ये ‘ रामलिंग’ या नर वाघाचे पहिले छायाचित्र 2024 मध्ये टिपण्यात आले. टिपेश्वर वन्यजीव अभय अरण्यातील वाघीनीच्या बछड्यापैकीच एक बछडा धाराशिव जिल्ह्यात आढळून आला होता. आईशी विभक्त होवून यसा बछड्याने जवळपास 600 किलोमिटरचा प्रवास करत 2024 मध्ये धाराशिव गाठले. येडशी वनक्षेत्रातून बीड जिल्ह्यातील नायगारव मयूर अभय अरण्यात रामलिंगचा अधिवास अढळून आला. त्यानंतर रामलिंगने बैल, घोडा पुन्हा बैलाची शिकार केली. त्यानंतर आष्टी तालुक्यातील देवळाली (लोखंडी) येथे शेतकर्यावर हल्ल्याची घटना समोर आली या हल्ल्यात शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शनिवारी (दि.7) आष्टी तालुक्यातील देवळाली तहत लोखंडवाडी येथील देवीदास टकले हे वनक्षेत्रात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले असता ‘रामलिंग’च्या हल्ल्यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची घटना घडली.
विदर्भामध्ये वाघाच्या दर्शनासाठी पर्यटकांची रिघ लागलेली असते ज्यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्यांही वाखणण्याजोगी आहे. त्यातच आता विदर्भातील वन्यजिव अभय अरण्यामधील वाघ आता तब्बल 600 किलोमिटरचा प्रवास करून मराठवाड्याच्या दिशेने मार्गक्रम करत असल्याने हे नैसगर्गिक जैवविविधेसाठी समाधानकारक गोष्ट असली तरी नागरीकांनीही तेवढीच सतर्कता बळगण्याची गरज आहे.
विदर्भातील टिपेश्वर वन्यजिव अभय अरण्यात सन 2022 मध्ये एका वाघीनीपोटी जन्मलेल्या बछड्याने दोन वर्षानंतर आपल्या आईशी विलग होवून सन 2024 मध्ये तब्बल 600 किलोमिटरचा प्रवास करत मराठवाड्यातील धाराशीव जिल्ह्यात येडशी वनक्षेत्र गाठले. यवतमाळ, नांदेड, लातूर मागर्र्े हा वाघ धाराशिवच्या येडशी वनक्षेत्रात दाखल झाला असा कयास लावला जात आहे. येडशी वनक्षेत्रात 2024 मध्ये पहिल्यांदा या वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. हे छायाचित्र डब्ल्यूआयआय कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. ज्यामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभ्यय अरण्यात 2022 मध्ये एका वाघीणीच्या पोटी जन्मलेल्या वाघाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षानंतर या वाघाने आपल्या आईशी विलग होवून आपल्या नव्या हद्दीसाठी यवतमाळ ते धाराशिव असा 500 किलोमिटरचा केला.
विदर्भातील जंगलातून मराठवाड्यात दाखल झालेला हा काही पहिला वाघ नाही, सन 2019 मध्ये जून महिन्यात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभय अरण्यातून बाहेर पडलेला रेडिओ कॉलर लावलेला ीं-ळ, ल-ळ हा वाघ स्थलांतर करून डिसेंबर 2019 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभय अरण्यात पोहचला. त्याकाळात त्याने दोन राज्य आठ जिल्ह्यांमधून जवळपास 2500 हून अधिक किलोमिटरचा प्रवास केला पुढे तो वॉकर म्हणून ओळखला गेला. 17 ऑक्टोबर 2026 मध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बोधडी वनपरिक्षेत्रातील मदनापूर जवळ रेल्वेच्या धडकेत एका मादी वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सन 2024 मध्ये धाराशिवमध्ये पहिल्यांदा कॅमेर्यात टिपलेला वाघ हा टिपेश्वरमधूनच आला आहे. टिपेश्वरमधून मराठवाड्यात गेल्या काही वर्षात होणारी वाघांची हालचाल ही अधोरेखित करावी अशीच आहे.
दरम्यान, डिसेंबर ते जून पर्यंत ‘रामलिंग’ हा वाघ बार्शी, येडशी, तुळजापूर या पट्ट्यामध्ये अधिवास करून होता. त्यानंतर तो बीड जिल्ह्यातील नायगाव मयूर अभय अरण्यात दाखल झाला. वनविभागाने नायगाव वनक्षेत्रा लावलेल्या ट्रॅप कॅमेर्यामध्ये ऑक्टोबर 2026 मध्ये त्याची हालचाल पहिल्यांदा कैद झाली. त्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ‘ रामलिंग’ ने मयूर अभय अरण्य परिक्षेतातील पिंपळगाव (धस) येथे बैलाची शिकार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर नायगाव मयूर अभय अरण्याच्या पश्चिम टोका लगत असलेल्या डोंगरकिन्ही, अंमळनेर परिसरात त्याचा अढळ होता. अमंळनेर (भांड्याचे) येथे बैलाची शिकार केल्या नंतर ‘रामलिंग’ सौताडा (रामेश्वर) वनपरिक्षेत्रात दाखल झाला. सौताडा वनपरिक्षेत्रात ‘ रामलिंग’ ने देवाला सोडलेल्या घोड्याची शिकार केली. वनपरिक्षेत्रात घोड्याची शिकार केल्यानंरत रामलिंगने आष्टी तालुक्यातील देवळालीच्या वनपरिक्षेत्राच्या दिशेने मार्गक्रम केला. देवळाली तहत लोखंडवाडी हद्दीतील वनपरिक्षेत्रात जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या देविदास माणिक टकले रा. देवळाली (लोखंडी) यांच्यावर रामलिंगने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. 7 नोव्हेंबर 2026) समोर आली. या हल्ल्यात देविदास टकले यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. वनक्षेत्रात जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेले देविदास टकले परत न आल्याने त्यांच्या शेाधासाठी त्यांचा मुलगा वनक्षेत्रात गेला असता समोरचे द़ृष्य पाहून त्याची पायाखालची जमिन सरकली.
समोरच्या दृष्याने डोळ्यासमोर अंधार्या आल्या. देविदास टकले यांनी गवत कापून ठेवलेल्या ढिगार्या जवळ रक्ताने डाग दूरवर पडलेले दिसले. रक्ताच्या डागाचा माग काढत त्यांचा मुलगा जवळपास पाचशी मिटर अंतरावर पोहोचला असता तिथे देविदास टकले यांचा मृतदेह त्यास दिसून आला. त्याने तातडीने गावातील लोकांना मदतीसाठी पाचारण केले मात्र तो पर्यंत देविदास टकले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हल्ह्यात ‘ रामलिंग’ ने देविदास टकले यांना जवळपास 500 मिटर फरफटत नेले. सध्या दुष्काळात जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंंभीर बनला आहे. जनावरं जगवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणच्या चार्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून देविदास टकले वनक्षेत्रात जनावरांच्या चारा योग्य गवत आणण्यासाठी गेले आणि दबा धरुन बसलेल्या काळाने त्यांच्यावर झडप घातली. या दुर्दैवी घटनेनंतर वन विभागने घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाठी ठस्यांचे नमुने घेतले असता ते वाघाचेच असल्याचे निष्पन्न झाले.
बीड जिल्ह्यातील नायगाव मयूर अभय अरण्यातील अढळून आलेल्या वाघाच्या अधिवासानंतर वन विभागाच्या ट्रॅप कॅमेर्यात नंतर वाघाची हालचाल टिपण्यात आली नाही, त्यामुळे पहिल्यांदा ट्रप कॅमेर्यात टिपण्यात आलेला ‘रामलिंग’ वाघच अधिवासाची ठिकाणं बदलत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
शेतकर्यांना सतर्कतेचा इशारा : टिपेश्वर वन्यजीव अभय अरण्यातून आपल्या नव्या हद्दीसाठी मराठवाड्यात दाखल झालेल्या ‘रामलिंग’ वाघ अधिवासाची ठिकाणं बदलत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेतात काम करण्यासाठी एकट्याने जाणे टाळावे खास करून महिला वर्गाने, जवळ घुंगराची काठी बाळगावी, रात्रीच्या वेळी शेत वस्तीवर शेकोटी पेटती ठेवावी असा सल्ला वन विभागाकडून देण्यात आला आहे.

