तळोद्यात वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण सहयोगच्या पुढाकाराने रुग्णांना विविध उपकरणे पुरवण्याच्या उपक्रम .. (.कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार) नंदुरबार: तळोदा येथील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग रुग्ण सेवा केंद्र च्या माध्यमातून रुग्णासाठी अंथरुणात खीळलेल्या रुग्णांना घरगुती उपचार घेत असलेले अंथरुणात खीळलेल्या रुग्णांसाठी ही उपकरणे पुरवण्यात येतात या उपकरणांच्या लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला सहयोग सोशल ग्रुपच्या ग्रुप तर्फ अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी रुग्ण सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्रामार्फत व्हीलचेअर, वॉटर बेड कमोड चेअर ,वॉकर ,एअर बेड ,बॅक रेस्ट ,सक्शन मशीन ,युरीन पोट ऑक्सीमीटर ,सेमी पावलर बेड आधी उपकरणांची सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली आहे विविध आजाराच्या अंथरुणात खिळलेल्या रुग्णांना घरी उपचारासाठी अनेक विविध उपकरणाची आवश्यकता असते हे उपकरणे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात मात्र घरच्या घरी ज्या रुग्णांवर उपचार सुरू असतात त्यांनाही उपकरणे स्वतः खरेदी करणे त्यांच्या आवाक्या बाहेरचे असते कारण ही वैद्यकीय उपकरणे अत्यंत महागडी असतात सर्वसामान्य रुग्णांना ती खरेदी करणे शक्य नसते ही अडचण लक्षात घेऊन शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप तर्फे रुग्णांना विविध आजारात घरगुती साठी आवश्यक असणारी उपकरणे खरेदी करून नामात्र अनामात शुल्क आकारून रुग्णांना पुरविण्यात येतात काम झाल्यावर हे उपकरणे परत करण्यात यावीत जेणेकरून दुसऱ्या गरजू रुग्णांना पण या वस्तूंच्या लाभ मिळू शकेल ही संकल्पना एडवोकेट अल्पेश जैन, डॉक्टर योगेश बडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षापासून राबविण्यात येत आहे यामुळे अनेक गरजू रुग्णांना या उपकरणाच्या लाभ मिळत आहे सहयोग सोशल ग्रुप या सेवाभावी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अंथरुणात खिळलेल्या रुग्णांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे पूर्वेण्यात येत असल्याच्या सेवाभावी उपक्रमाबद्दल या संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन, डॉक्टर योगेश बडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे या उपक्रमासाठी हुसेन बोहरी नुरुद्दीन बोहरी हुसेन मर्चंट महेंद्र सूर्यवंशी डॉक्टर भीमसिंह गिरासे डॉक्टर लक्ष्मीकांत चौधरी कुशल जैन चेतन शर्मा प्रमोद जांगिड विनोद माळी चेतन धनका ,किसन भरवाड यांचे सह इतर सामाजिक सेवाभावी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे.प्रतिक्रिया -:घरात उपचार सुरू असलेल्या व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना महागडी वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे शक्य नसते म्हणून सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून एक सेवाभाव म्हणून अशी उपकरणे पुरविण्यात येतात ज्याच्या योग्यरीत्या वापर करून काम झाल्यावर संस्थेला परत करावी जेणेकरून इतरांनाही या वस्तूच्या लाभ मिळू शकेल डॉक्टर योगेश बडगुजर तळोदा प्रतिक्रिया-: अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घरगुती उपचारासाठी सहयोग सोशल ग्रुपच्या माध्यमातून विविध उपकरणे बेड रिटन पेशंट साठी पुरविण्यात येतात त्यांनी त्याच्या योग्य लाभ घ्यावा या वस्तू काळजीपूर्वक वापराव्यात जेणेकरून इतरांना त्याच्या लाभ मिळू शकेल.एडवोकेट अल्पेश जैन अध्यक्ष सहयोग सोशल ग्रुप तळोदा

Previous Post Next Post