‘त्या’ दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी. (राहुल दुगावकर,जिल्हा प्रतिनिधी, नांदेड ). बिलोली: शहरातील स्वस्त धान्य दुकानदार दुकान क्रमांक 10 मशिन क्रमांक 151114600125 अमानुल्लाखान खाजाखान हे दुकानदार वास्तव्यास बिलोली शहरात राहत नसुन ते तेलंगाना राज्यात निर्मल जिल्हयात मुक्कामी राहत आहेत. रास्तभाव दुकानदार तेलंगाना राज्यात मुक्कामी राहुन महाराष्ट्र शासनाचा सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान चालवत आहे. रास्तभाव दुकानदार अमानुल्लाखान खाजाखान हे गोर गरिब लाभार्थ्याला स्वस्त धान्य हे वेळेवर देत नसल्याचे नागरीकांची तक्रार होती.अनेक वेळेस राशन कार्ड लाभार्थी तहसिल कार्यालय बिलोली वर भव्य मोर्चा काढुन अनेक वेळेस लेखी तक्रार दिली होती तक्रारीनंतर बिलोली तहसिल कार्यालयाचे पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार व पेशकार यांच्याकडुन सदर दुकानाची दि.१३-०२-२०२४ रोजी चौकशी करण्यात आली पण त्यावेळी फक्त 2 ते 3 लाभार्थी उपस्थित होते चौकशीत लाभार्थीचे म्हणणे असे होते कि दुकानदार बिलोली शहरात वास्तव्यात राहत नसुन ते तेलंगाणा येथे स्थलांतरित झाले आहे त्यामुळे वेळेवर धान्य वितरण करीत नाहीत, दुकानात धान्य येऊन वीस ते पंचवीस दिवस झाल्यावरीही धान्य देत नाहीत. शेवटचे २ ते ३ दिवस शिल्लक असताना राशन घेऊन जावे असे अटी व शर्त ठेवतात आणि याबाबत लाभार्त्यानी काही विचारणा केल्यास उरमट भाषेत शिविगाळ करून अपमानित करतात. तसेच दुकानाच्या दर्शणी भागात कोणतेही फलक बोर्ड नाही, कोणत्याची प्रकारचे योजनेचे याद्या नाहीत, किंवा राशन घेतल्यानंतर पोच पावती देत नाहीत. तसेच राशन कार्ड वर जेवढे लाभार्थी आहेत संख्येप्रमाणे धान्य देत नाहीत. शेवटचे २ ते ३ दिवस शिल्लक असताना राशन देत असून शेवटी धान्य संपले आहे, धान्य नाही असे जाहीर करून दुकान बंद करून निघून जातात. शासन नियमावली प्रमाणे दुकान दररोज स्वस्त धान्य दुकान सुरु ठेवुन धान्य देणे दुकानदाराचे काम असताना नियमाची पायमल्ली करून नियमाचे पालन न करता व धान्याची काळाबाजारी करीत आहे.सदर दुकानाची चौकशी होऊन तीन महीने झाल्यानंतरही कोणतीच कार्यवाही झालेली नाही त्यामुळे दुकानदार सर्वाना तुम्ही कुठेही तक्रार करा ? मला काही होत नाही ? काही फरक पडत नाही ? असे उर्मट भाषेत उत्तर देत आहे. जर एखादा रास्तभाव दुकानदार लाभार्थ्याला धान्य न देता आपला मनमानी कारभार करत असेल तर गोरगरिब राशन कार्ड लाभार्थ्यांनी काय कराव असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर एखदा रास्तभाव दुकानदार वेळेवर राशन वाटप करू शकत नसेल तर त्याला शासनाने नेमणुक करुन दिली. महाराष्ट्र राज्य आणि तेलंगाणा राज्य या दोन्ही राज्यात राहून दोन्हीकडील शासकीय योजनानाचा फायदा घेऊन फसवणुक करणारा रास्तभाव दुकानदार अमानुल्लाखान खाजाखान यांच्या नावाचा परवाना रद्द करुन इतर बिलोली शहरातील कोणत्याही रहिवाशी नागरीकाला देण्यात यावा. परवाना रद्द करुन फसवुणीकीचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. याविषयी जाणीवपुर्वक दुर्लक्ष किंवा विलंब झाल्यास लाभार्थी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे करण्यात आला आहे निवेदनामध्ये शेख मोहसीन अहमद, मारोती वाघमारे, शेख अजीम, मनोहर नुग्रवार, सरफराज खान, साईनाथ शिवलाड, शेख इमरान, संतोष रेडिवार, दत्ता खंडेराय, संतोष इळेगाव, शेख वाशिम, शेख सरफराज, इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post Next Post