सेलू शहरात विठ्ठू नामाचा गजर. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी )परभणी . फटाक्यांची आतिशबाजी व पुष्पवृष्टी ने केले दिंडीचे स्वागत.सेलू : दि 17 ,जुलै बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयात येथील बाल वारकरी यांची ज्ञानदिंडी चे छत्रपती शिवाजी नगर मध्ये दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी ज्ञानदिंडीचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टीने केले सर्व वारकरी वेशभूषेत, तसेच पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थीनी टाळ पथकावर ठेका धरत माऊली माऊली या गीतावर टाळ वाजवत विठ्ठल नामाचा गजर केला छत्रपती शिवाजी नगर मित्रमंडळा तर्फे प्रशांतसिंह ठाकूर व सुनील गायकवाड यांनी मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके , बालासाहेब हळणे यांचे स्वागत केले. तसेच फराळवाटप करण्यात आला. या प्रसंगी प्रशांतसिंह ठाकुर, विठ्ठल ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, शंकरराव गात, सुनील जगताप, कैलास उघडे ,ज्ञानेश्वर टाके, सोपान ढवळे ,भागीरथ यादव, रमेश दोड ,बाळू प्रधान, रामा जाधव, गोकुळ आप्पा डोळझापे ,बालाजी खरात ,अमित जाधव ,महादेव बेंदर, शुभम काळबांडे ,अनिल टाके ,मनोज जैस्वाल ,राहुल सोनाळकर, बालाजी डोंबाळे,व सर्व महिला मंडळ व मित्र मंडळ उपस्थित होते.

Previous Post Next Post