माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळ व गोविंदबाबा मित्र मंडळ यांच्या वतीने फराळ व फोटोचे वाटप. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी) परभणी. सेलू : दि. 17 आषाढी एकादशी निमित्त विनोद बोराडे मित्र मंडळ व श्री संत गोविंद बाबा मित्र मंडळ आयोजित शालेय दिंडीचे स्वागत व फराळ वाटपाचा कार्यक्रम आज श्री गोविंद बाबा चौक मठ गल्ली येथे अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.श्री विठ्ठल रखुमाई यांची वेशभूषा साकारून आलेले बाल वारकरी यांनी त्यांच्या निरागसतेने खऱ्या पांडुरंगाचे दर्शन या वेळी घडविले.आयोजकातर्फे त्यांचे स्वागत हार पुष्पगुच्छ व त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे श्री विठ्ठलाची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी श्री गोविंद बाबा मित्र मंडळ व विनोद बोराडे मित्र मंडळाने परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0