*मागास विद्यार्थी वस्तीगृह ब्रम्हपुरी येथे शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती )भद्रावती दि.20:- ब्रम्हपुरी :- मागास विद्यार्थी वस्तीगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री. राजेंद्रजी वाढई याच्या अध्यक्षतेखाली तसेच संत कबीर मुलींचे वस्तीगृह ब्रम्हपुरी येथील अधिक्षीका मा. कु. सीमा नाकतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वसतिगृहाचे अधीक्षक श्री. अक्षय खरवडे तसेच ईतर कर्मचारी व विद्यार्थ्याचा उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच दी. 2 फेब्रुवारी ला वसतिगृहात झालेल्या निरोप समारंभ कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या कब्बडी , क्रिकेट स्पर्धांमध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांचे आज शिवजयंती निमित्त सत्कार करून पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर दीनांक 16 फेब्रुवारी ला ब्रम्हपुरी क्रीडा स्पर्धा 2025 ला वसतिगृहातील विद्यार्थी ओमकार बोगा याने वसतिगृहाचे प्रतिनिधित्व व गोळा फेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार व प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन व वर्ग 10 व 12 च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मागास विद्यार्थी वस्तीगृह ब्रम्हपुरी येथे  शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*.                                    
Previous Post Next Post