संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त चाळीसगाव तालुक्यातील समाज बांधवांची अपेक्षेपेक्षा जास्त अलोट गर्दी... साडे तीनशे वर्षापुर्वीच्या ऐतिहासिक देखाव्यांच्या विविध पारंपारिक सजावटीसंह रथावर संत सेवालाल महाराजांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली, बंजारा संस्कृतीचे संवर्धन व्हावे या हेतूने,सांस्कृतिकदृष्या पारंपारिकरीत्या काढण्यात आलेल्या शौभायात्रा मिरवणुकीतून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले, मौगलांपुढे न झुकता विरोधात लढा देणारे त्याकाळातील आशिया खंडातील श्रीमंत असलेले दानशुरवीर बाबा लकीशा आणि बंजारा यांच्या कुशल व्यापार नितीमुळे जगरभारत व्यापारी म्हणून ओळखला जाणारा बंजारा समाज व्यवसायाच्या निमित्ताने त्याकाळापासून देशभर बैलगाडीवर लदेणी अर्थात ( भटकंती ) करायचा, तांडा नायक म्हणून संत सेवालाल महाराज आपल्या प्रमुख साथीदारांसोबत घोड्यांवर स्वार होऊन पुढे चालायचे आणि पाठीमागे गाई गुरं ढोरांसह बैलगाडी बसून माता भगिनी प्रवास करायच्या अशा ऐतिहासिक देखावा, प्रतिकृतीची ,सजावट मिरवणुकीत करण्यात आली होती, बहुतांस तांड्यातील बांधवांनी पारंपारिकरीत्या उत्कृष्ट सजावट केलीली लांगड ( बैलगाडी ) मिरवणुकीत आणल्या होत्या त्यापैकी जुणपाणी आणि ओढरे तांड्यातील बांधवांनी सुंदर सजावट केलीली बैलगाडी आणल्याचा मान मिळवला...जवळपास २० ते २५ समाजातील पारंपारिक डफवादकांनी जुन्या काळातील तालावार डफ वाजवून माता भगिनींसह तरूण बांधवांचा आनंद द्विगुणित केला ....बॅंजो डिजेच्या तालावर नाचणारे बांधव पारंपरीक डफ वाद्यांचा तालावर नाचून जास्त आनंद घेतांना दिसले ,, संत सेवालाल महाराजांच्या भुमिकेत वेशभूषा परिधान करून घोड्यावर स्वार सेवालाल महाराज बघून हुबेहूब सेवालाल महाराजच दिसत असल्याचे समाज बांधव अनुभवत होते, मिरवणुकीत सजवून आणलेल्या निरनिराळ्या २२ घोड्यांमुळे मिरवणुकीची अधिक शोभा वाढली होती, दयानंद कार्नर ,जुने तहसिल कार्यालय व, छत्रपती शिवाजी महाराज चौक अदी ठिकाणी मंडप टाकून भाविकांच्या दर्शनासाठी संत सेवालाल महाराजांची प्रतिमा ठेवण्याची उत्तम व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली होती, हजारो भाविकांनी प्रतिमा पुजन करून महाराजांना अभिवादन दयानंद कॉर्नर येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी प्रतिमा पुजन करून अभिवादन केलेत, दयानंद कॉर्नर पासून मिरवणूकीला सुरुवात करून सानेगुरुजी हॉल या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झाली, आयोजकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आले व या ठिकाणी शिवाजी महाराज चौकात संत सेवालाल महाराजांची सामुदायिकरित्या आरती घेण्यात आली, उपस्थित समाजातील जेष्ठ मंडळींच्या हस्ते संत सेवालाल महाराजांना भोग लावूण अरदास करण्यात गाण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.जि.सदस्य मा. सुभाष दादा चव्हाण हे होते तर व्यासपीठावर मा, खासदार एम, के , अण्णा पाटील, उन्मेष भैय्यासाहेब पाटील ,समाजातील जेष्ठ नेते रामदास रायसिंग जाधव , प्राणी मित्र इंदल चव्हाण , मोरसिंग भाऊ राठोड, कृ.उ.बा. समितीचे सभापती मा. मच्छींद्र भाऊ राठोड , बंजारा एकीकरण समितीचे अध्यक्ष मा.देवेंद्र डि. नायक , ह.भ.प. काशिनाथ जाधव माऊली, समाजाचे जेष्ठ पत्रकार सरीचंद जाधव, कांतिलाल नायक , डॉ, संयोगिताताई नाईक, नमोताई राठोड, मा .जि.प. सभापती राजेंद्र राठोड , मा. पं.स. सभापती विजय जाधव, साहेबराव पुना चव्हाण ,म्हाडाचे निवृत्त अधिकारी अनिल राठोड, व.ना. आ. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय राठोड, कोमल जाधव सर, गोर बंजारा परिशदेचे प्र .दे.अध्यक्ष भिकण जाधव , मदन जाधव , डॉ .अभिमन्यू राठोड, डॉ. राठोड तुषार राठोड, कवीवर्य विष्णुकुमार जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी शेषराव राठोड, बंजारा एकीकरण समितीचे सचिव चिंतामण चव्हाण, तांड्यातील सर्व आजी माजी सरपंच ,अदी समाजातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते,,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भावलाल सर,गोरख राठोड, अॅड. वाडी लाल चव्हाण अदी वक्त्यांनी केलेत,, तर प्रास्ताविक सुधाकर राठोड यांनी मांडले तसेच आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, जयंती उत्सव समितीचे सुधाकर राठोड, संदिप राठोड, गोरख राठोड, साहेबराव राठोड ,अॅड . वाडीलाल चव्हाण, संजय राठोड, भरत राठोड, विक्रांत चव्हाण विकास राठोड, तोळारम राठोड , राज चव्हाण,विलास जाधव , योगेश जाधव, राहुल राठोड ,अदी आयोजक कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले,,जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाज बांधवांनी एकजूट दाखविल्याबद्दल आयोजकांच्या वतीने शतशा... आभार ..🙏🙏भिमराव जाधव ( सा. कार्यकर्ता चाळीसगाव ) ...
byमीडीया पोलीस टाईम
-
0

