**राम मंदिर परिसर व परकोट मोहल्ला परिसरातील रस्त्याचे डाॅ. अकूंशराव लाड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन**( मानवत शहरातील चार वस्त्यांचा रस्ता प्रश्न सुटला. ). (*मानवत / प्रतिनिधी.)जुने मानवत म्हणून प्रसिद्ध असलेले राम मंदिर परिसरातील चार वस्त्यांच्या मध्ये जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. तो १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या रस्ता उद्घाटनाने कायमचा मिटला. या रस्त्याचे उदघाटन १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. मानवत शहर हे मुख्य रस्ता व परिसरातील उच्चभ्रू कॉलनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु जुने मानवत म्हणून ओळख असलेले ज्या काही वस्त्या आहेत त्यामध्ये राम मंदिर परिसर , परकोट मोहल्ला, रामबाग ,नारायण नगर ,बाराहाते गल्ली ,धनगर गल्ली ,जुने लाड गल्ली , क्रांती चौकव पेठ मोहल्ला अशा वस्त्यांनी जुने मानवत फुलले आहे. यातील रामबाग राम मंदिर परिसर परकोट मोहल्ला व नारायण नगर या भागातील अंतर्गत रस्ते बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते अखेर१७ फेब्रुवारी रोजी या रस्ता कामाचे उद्घाटन मानवत शहराचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते पार पडले. नारायण नगर , रामबाग , राम मंदिर परिसर व परकोट मोहल्ला या भागात प्रामुख्याने हटकर समाज , लाड समाज व काही प्रमाणात जुन्या वस्त्या वसलेलं आहेत. या वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते होणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी बऱ्याच दिवसापासून युवा नेते डॉ. अंकुश लाड यांना सदर रस्ते करण्याबाबत मागणी केली होती. शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून डॉ. अंकुश लाड यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला. १७ फेब्रुवारी रोजी या कामाचे प्रत्यक्षात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मानवत शहराची युवा नेते डॉ. अंकुश लाड प्रभागाचे नगरसेवक बाबुराव हळनोर यांचे सह बाजीराव हाळनोर , मुंजाभाऊ तरटे , अनिल गडदे ,बालाजी बेलनोर ,शंकर तरटे , अंगद तरटे , पिंटू शिंदे , बापू हाळनोर , बालाजी हाळनोर , अनिल गडदे , राजाभाऊ खांडेकर , प्रवीण खरात , गजानन मोरे व रौफ वस्ताद आदींची यावेळी उपस्थित होती .***

राम मंदिर परिसर व परकोट  मोहल्ला परिसरातील रस्त्याचे  डाॅ. अकूंशराव लाड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन**( मानवत शहरातील चार वस्त्यांचा रस्ता प्रश्न सुटला. ).                                                                     
Previous Post Next Post