महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

 महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण
........................................
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 
===================
वर्धा, दि.1, महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनाचा मुख्य सोहळा पोलिस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण व सत्कार करण्यात आला. 
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी,मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण,वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,अप्पर जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर आदी उपस्थित होते.
सन 2025-26 या वर्षाकरीता जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कारसाठी निवड करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी माधुरी अडमाचे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पोलिस महासंचालकांकडून सन्मानित करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक मंगेश भोयर, पोलिस उपनिरिक्षक अमोल लगड, वाहतुक मदत केंद्र जामचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक भारत पिसुर्डे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक सतिश दरवरे, सायबर सेलचे पोलिस हवालदार दिनेश बोथकर, महिला पोलिस शिपाई  सुनैना डोंगरे यांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
Previous Post Next Post