*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विविध गूणदर्शन स्पर्धेत भाग घेणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप.**. (मानवत / प्रतिनिधी.)**मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये २३ जानेवारी ते २६ जाणेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या गूणप्रदर्शन व विविध मैदानी खेळाच्या स्पर्धेत विजयी झालेल्या शालेय स्पर्धक मूलांना आज बक्षीसांचे वाटप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषराव डख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मिनाक्षीताई कहात , सोनालीताई माने , अनिल चव्हाण आदींची उपस्थिती होती.**सविस्तर वृत्त असे की,** येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या, नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्त्य साधून विद्यालयात विविध गूणप्रदर्शन व बौध्दीक, शारिरीक खेळ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यावेळी शालेय विद्यार्थ्याॅनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत प्रथम व द्बितिय विजयी होणार्‍या स्पर्धेतील विजयत्यांना आज बक्षिसाचे वाटप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषराव डख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मिनाक्षीताई कहात, सोनालीताई माने , अनिल चव्हाण, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह शालेय विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.**

*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विविध गूणदर्शन स्पर्धेत भाग घेणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप.**.                                                
Previous Post Next Post