*श्री व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता यावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन*. रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, पीएम-उषा सॉफ्ट कंपोनंटच्या प्रायोजकत्वाखाली, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या सहकार्याने, 18 फेब्रुवारी 2025 रोजी "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिचा भारताच्या मानवता, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर होणारा प्रभाव" या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय आंतरविद्याशाखीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.या परिसंवादाचे उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी असतील. संस्थेचे अध्यक्ष हेमंत सेठ देविदास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.या परिसंवादात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवता, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर होणाऱ्या परिणामांवर विविध तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ. अतुल वाडेगावकर (एमडी एडब्ल्यू कन्सल्टिंग, पुणे), डॉ. अपूर्वा ए. देसाई (प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, संगणक विज्ञान, वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत), प्रा. डॉ. बी. व्ही. पवार (संचालक, आयएमआर, जळगाव), डॉ. डी. एम. नागरिक (जी. एस. कॉलेज, खामगाव) हे प्रमुख वक्ते असतील. या परिसंवादात प्रा. सी. पी. गाढे (समन्वयक),प्रा. डॉ. ए. एन. सोनार(आयोजक सचिव), डॉ. व्ही. बी. सूर्यवंशी(निमंत्रक),प्रा. एस. डी. धापसे, प्रा. एस. यू. पाटील, डॉ. एस. जी. चिंचोरे, डॉ. जी. आर. ढेम्बरे,डॉ. एन. बी. जाधव, प्रा. एस. बी. धनले(समन्वय समिती) तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे स्थानिक आयोजन समिती मध्ये आहेत. या परिसंवादात सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाने केले आहे. रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, रावेर ही शिक्षण क्षेत्रात चांगले नाव असलेले संस्था आहे. संस्थेने ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने 1978 मध्ये श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक यांनी या संस्थेची स्थापना केली. श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, हे उत्तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित महाविद्यालय आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

