*सौ, रामकंवर द्बारकादास लड्डा विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी. (.मानवत // प्रतिनिधी.)पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मानवत येथील सौ. रामकवर द्वारकादास लड्डा विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वर्ग पहिली मधिल विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषण, वेशभूषा, आणि पोवाडा सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका मेघा भुसारे मॅडम, प्रमुख पाहुणे नीता गळाकाटू मॅडम, सारिका पवार मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्तराव शिंदे यांनी केले.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.***

सौ, रामकंवर द्बारकादास लड्डा विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.                                  
Previous Post Next Post