ज़ि. प. प्रा. हिप्परगा थडी येथे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, उत्साहात साजरी. मारोती एडकेवार /सगरोळी सगरोळी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी येथे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,आजरामर युद्धे, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज,यांची जयंती,अत्यंत उत्साहात, व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपसरपंच मारोती एडकेवार होते, यावेळी पोलीस पाटील शंकराप्पा मठपती,माजी सरपंच साहेबराव अजनीकर, शिवसेना उद्धव ठाकरे शाखाध्यक्ष इरफान देसाई,दौलतापुर चे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील भोसले,तसेच शाळेतील शिक्षक बालाजी गेंदेवार सर,सर्व गावातील नागरिक,विद्यार्थी,शिक्षणप्रेमी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.शाळेतील सर्व विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. व गेंदेवार सरांनी,विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा गौरवशाली इतिहास, उलगडून दाखवला,त्यांनी सांगितले की शिवाजी महाराज हे एक केवळ एक योद्धा नव्हते, तर एक आदर्श नेता, शिस्तप्रिय प्रशासक आणि मातृभूमीचे खरे रक्षक होते. धाडसी आणि न्यायप्रिय नेतृत्वाचे अनुकरण करणे,खरे अभिवादन ठरेल.असे गेंदेवार सरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे,भाषणे, व देशभक्तीपर,गीत सादर करण्यात आले,कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

ज़ि. प. प्रा. हिप्परगा थडी येथे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, उत्साहात साजरी.                         
Previous Post Next Post