गणपती वॉर्ड येथे श्रीराम नवमी उत्सवसप्तखंजरी किर्तन व भव्य शोभायात्रा विशेष आकर्षण.. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि.1:-शहरातील गणपती वॉर्ड येथे मर्यादा पुरुष प्रभू श्री राम जन्मोत्सवानिमित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक.४ एप्रिलला रात्री प्रती सत्यपाल महाराज म्हणून ख्यातिप्राप्त सप्तखंजरी वादक कीर्तनकार पंकज पाल महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक.६ रोज रविवारला भजन मंडळी, श्रीराम जन्मोत्सव निमित्य वॉर्डातील उत्साही व कल्पक युवकांच्या संकल्पनेतून साकार होणारे देखावे विशेष आकर्षण असून सोबतच, आकर्षक रोषणाई, कलशधारी महिला, वानर सेना यांच्या सहभागातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तरी सर्व रामभक्तानी, वॉर्ड वासियांनी सहकार्य करून मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन गणपती वॉर्ड येथील श्री राम नवमी उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

गणपती वॉर्ड येथे श्रीराम नवमी उत्सवसप्तखंजरी किर्तन व भव्य शोभायात्रा विशेष आकर्षण..                                      
Previous Post Next Post