**मानवत येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी**( वक्फ संशोधन बिलाच्या विरोधात काळी फिती हाताच्या बाजूला बांधुन ईद ची नमाज अदा ). (*मानवत / प्रतिनिधी. )*============================*मानवत शहरात रमजान ईद दि.31 मार्च सोमवार रोजी मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरी करण्यात आली.उक्कलगाव रोड येथील मोठ्या ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक नमाज अदा केली. या प्रसंगी एकमेकांना गळाभेट देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देवाणघेवाण करण्यात आली...सकाळी लवकरच नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव ईदगाहकडे रवाना झाले होते....मौलाना सुलतान मिल्ली यांनी नमाज पठणानंतर धार्मिक प्रमुखांनी बंधुत्व, शांती आणि समाजात ऐक्य टिकवण्याचा संदेश दिला. त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देत आनंद साजरा केला.शहरात ईदच्या निमित्ताने शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासन सतर्क होते. मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप बोरकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बंदोबस्त तैनात करण्यात आले होता.. मुख्य चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ईद निमित्त बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण होते....रमजान महिनाभर रोजे (उपवास) केल्यानंतर आलेल्या या आनंदाच्या सणानिमित्त विविध ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रमंडळींसोबत सण साजरा केला....या प्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मानवत नगर परिषद चे अधिकारी व कर्मचारी शिवसेना शिंदे गटाचे राजकीय पुढारी उपस्थित होते. रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी समाजात एकता आणि प्रेमाचा संदेश देण्याचा संकल्प व्यक्त केला.....ईद हा केवळ सण नसून, तो बंधुत्व, प्रेम आणि शांततेचा संदेश देणारा पर्व आहे. रमजान महिन्यानंतर येणारी ही ईद, संयम, त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीक मानली जाते.धर्मगुरूंकडून देशात शांती, सौहार्द आणि एकोपा टिकावा यासाठी विशेष दुवा करण्यात आली ही अतिशय सकारात्मक आणि समाजोपयोगी गोष्ट आहे. आजच्या काळात जेव्हा समाजात विविधता असूनही काही वेळा मतभेद निर्माण होतात, तेव्हा धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाने सर्व धर्मांमध्ये ऐक्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे...... धर्मगुरूंनी दिलेला संदेश सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र येण्याची प्रेरणा देतो. ईदच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन शांतता, प्रेम आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.....धर्मगुरू.हाफेज अब्दुल लतिफ........ चौकट......ईद हा आनंद आणि एकोपा साजरा करण्याचा सण आहे, आणि अशा प्रसंगी सर्वधर्मीय व्यक्तींनी एकत्र येऊन शुभेच्छा देणे समाजातील सलोखा वाढवण्यास मदत करते. मात्र, हे औपचारिकतेपुरते न राहता, समाजाच्या हितासाठी प्रत्यक्ष कार्य करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा आहे. जर हा उपक्रम निस्वार्थ भावनेने करण्यात आला असेल, तर तो नक्कीच कौतुकास्पद.....================================मानवत येथे काळ्या फिती लावून मुस्लीम बांधवाचे वक्फ संशोधन विधेयकास विरोध....... रमजान ईद ईद-उल-फित्र च्या दिवशी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनाल लॉ बोर्ड ने देशभरात वकफ संशोधन विधेयक २०२४ च्या विरुद्ध निषेध म्हणून शुक्रवार च्या नमाजा मध्ये हाताला काळी पट्टी बाधुन नमाज पढुन वक्फ बिलाचा विरोध मौन प्रदषण करण्याचे आवाहान केले होते या साठी वक्फ संशोधन विधेयक २०२४ विरोधात मानवत येथील मुस्लीम बांधवानी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे....=================================
byMEDIA POLICE TIME
-
0