रावेर तालुव्यात (ईद उल फित्र)रमजान ईद उत्साहात साजरी ... (रावेर तालुका प्रतिनिधी शेख जमिल) तालुव्यातील रावेर कुसूंबा लोहारा,विवरे, सावदा चिनावलसह तालुक्यात गावातील पवित्र रमजान ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच विवरे येथील इदगाहा मैदानावर सकाळी ८ वाजता ईद ची सामुहिक नमाज मौलाना जमील शेख यांनी पठण केली. नमाज नंतर सर्व मुस्लिम बांधवानी एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या,तसेच गावातील हिंदु मुस्लिम बांधवानी एकमेकांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या आहे,गावागावत एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, अनुचित प्रकार घडु नये म्हाणुन रावेर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयसवाल,निभोरा पोलिस स्टेशन चे सह पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे,सावदा चे सह पोलिस निरिक्षक विशाल पाटील, पोलिस कर्मचारी,एस आर पी चे जवान, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,
byMEDIA POLICE TIME
-
0