*शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले विरोधात आदिवासी व दलित समाज आक्रमक;पदावरून हटविण्याची मागणी**. भारत आदिवासी संविधान सेना,बिरसा फायटर्स, वंचित बहुजन आघाडी व दलित समाजाचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन;आंदोलनाचा इशारा*. (शहादा विशेष जिल्हा प्रतिनिधी: )शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्याविरोधात शहादा तालुक्यातील आदिवासी व दलित समाज आक्रमक झाला आहे.निलेश देसले पोलीस निरीक्षक यांना सेवेतून निलंबित करा व पदावर तात्काळ हटवा,या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना भारत आदिवासी संविधान सेना,बिरसा फायटर्स, वंचित बहुजन आघाडी व दलित समाजातर्फे नुकतेच देण्यात आले.यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,दलित समाजाचे तालुकाध्यक्ष दिलीप महिंद्रे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण निकुंभ, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे सुनिल पवार,सखाराम भील,सुभाष वाघ, पावन्ना भील, मच्छिंद्र वाघ, शहादा शहर अध्यक्ष इकबाल शेख, सुनिल भील,राजेश ठाकरे,विजय पवार, रोहित पवार, सुकलाल वाघ,लहू सनेर,गंगाराम पवार, सागर वाघ,योगेश मोगरे, सरावण वाघ,लक्ष्मण चौधरी,दिपक वाघ,तिल्या पवार, शरद पवार, अनिल वाघ, अनिल ठाकरे,विनोद वाघ,राजू वाघ,नागराज वाघ,गोविंदा वाघ,महिला प्रतिनिधी गोपिका वाघ इत्यादी भारत आदिवासी संविधान सेना,बिरसा फायटर्स, वंचित बहुजन आघाडी असे आदिवासी व दलित समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले हे आदिवासी विरोधात अपमानास्पद व पक्षपाती वागणूक देत आहेत.आदिवासींची तक्रार घेत जात नाहीत.जो तक्रार करायला जातो,त्या आदिवासींना पोलीस ठाण्यात डांबून ठेवतात. ज्या आदिवासी युवकांना गंभीर मारहाण झाली आहे,अशांनाच लाॅकअपमध्ये बंद करून ठेवतात.पिंपर्ळे येथील आदिवासी व्यक्तीस मारहाण व महिलांवर अत्याचार प्रकरण व शिरूर दिगर येथील आदिवासी युवकांस मारहाण प्रकरण, मराठा -गुजर समाजाच्या आरोपींना पाठीशी घालतात,ते सतत आदिवासींवर अत्याचार अन्याय करतात.विशेषत: पोलीस निरीक्षक निलेश देसले हे आपल्या पदाचा गैरवापर करून वारंवार आदिवासींवर अन्याय करत आहेत. आदिवासींवर हल्ले करणा-यांना मोकाट सोडून देतात, खरे गुन्हेगार मोकाट सोडतात व ज्यांच्यावर हल्ला झाला आहे,त्या आदिवासींनाच पोलीस ठाण्यात बंद करून ठेवतात. आदिवासी समाजाची बाजू मांडणा-या बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा या सामाजिक कार्यकर्त्यावरच बाईचा ३५४ चा खोटा आरोप लावून गुन्हा दाखल करून खोट्या केसमध्ये अडकवू अशी धमकी देतात.शहादा तालुक्यात वर्षानुवर्षे आदिवासी लोक गुजर पाटील समाजाच्या लोकांच्या शेतात मजूरी करतात. पण हेच लोक आदिवासींवर अत्याचार करतात. अत्याचार करून पोलिसांना पैसे देऊन तोडीपाणी करून प्रकरणे दाबून टाकतात. पोलीस अशा गुन्हेगारांना साथ देतात.आदिवासी मजूर बांधवांवर अत्याचार झाल्यावर पोलीस ठाण्यात साधी मराठी बोलता येत नाही,तक्रार कशी करायची ते कळत नाही, काय बोलायच ते समजत नाही,याचा पोलीस गैरफायदा घेऊन दबंग समाज व पोलीस मिळून अन्याय करत आहेत. दिनांक २८ मार्च २०२५ रोजी शहादा तालुक्यातील पिंपर्ळे या गांवातील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस मराठा समाजाच्या ६ लोकांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण करून दुखापत केली.तसेच आदिवासी महिलांना निर्वस्त्र करून हाणा,अशी अश्लील शिवीगाळ करून धमकी देत मारहाणीचा प्रयत्न झाला. लोखंडी पाईपने मारहाण झालेल्या आदिवासी व्यक्तीलाच निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात डांबून ठेवले.दिनांक २९ मार्च २०२५ रोजी आदिवासींची तक्रार दाखल करून घेतली नाही,पैसे घेतल्यावरच पोलीस ठाण्यात तक्रार घेतली जाते,असे गंभीर आरोप पोलीस निरीक्षकांवर करण्यात आले असून असा जातीभेद करून फक्त एका समाजाची बाजू घेणारा निलेश देसले सारखा पोलीस निरीक्षक शहादा पोलीस ठाण्यात नको हवा.निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा याच्यावर येत्या ८ दिवसांत कारवाई न झाल्यास सर्व आदिवासी संघटना मिळून पोलीस अधीक्षक नंदूरबार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात असल्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.

*शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले विरोधात आदिवासी व दलित समाज आक्रमक;पदावरून हटविण्याची मागणी**.                                                             
Previous Post Next Post