110 कुटुंबांना आधार देण्याचे लोकुलवार अण्णांचे कार्य प्रेरणादायी -- नामदार मेघना साकोरे बोर्डीकर. शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.सेलू : पोलीस कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदा पर्यंत महाराष्ट्र पोलीस दलात 38 वर्ष प्रामाणिक सेवा करून समाजातील युवकांना पोलीस दलात भरती होण्यासाठी मोफत प्रशिक्षण देऊन जिल्हयातील 110 कुटुंबातील तरुणांना शासकीय नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवअण्णा लोकुलवार यांचे कार्य समाज व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले.सेलू येथील साई नाट्यगृहात मंगळवार दि ०१ एप्रिल रोजी लोकुलवार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माधवअण्णा लोकुलवार यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संगीता सानप , तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, आर्यवैश्य महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार , उपाध्यक्ष गोविंदराव पाटील, राज्यसंघटक प्रदीप कोकडवार , युथ प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत कोकड, जिल्हाध्यक्ष हरिष कत्रुवार , सभापती बालाजी रुद्रवार , सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक पंडीतराव केंद्रे, संदीपान शेळके , रामनाना पाटील, विनोदराव बोराडे, अशोक काकडे , प्रभाकार वाघीकर , रवी बंडेवार विलास पाटील, सत्कारमुर्ती माधव अण्णा लोकुलवार, सौ राजश्री लोकुलवार , सौ. कांताबाई लोकलवार, अर्जुनराव लोकुलवार , डॉ मंथन लोकुलवार यांची उपस्थिती होती.पालकमंत्री व उपस्थित मान्यवराच्या हस्ते माधवअण्णा लोकुलवार व त्याच्या परिवाराचा मानपत्र , शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सेवागौरव करण्यात आला.सौ वर्षा कोल्हेकर, दत्ता घुले , विनायक मुनगीलवार , प्रदीप कोकडवार, अशोक काकडे, रामनाना पाटील, विनोदराव बोराडे, भानुदासराव वट्टमवार यांनी माधवअण्णा लोकुलवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंवर विचार मांडून त्यांना व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन कोतावार , स्वागतपर मनोगत विनोदराव बोराडे, मानपत्र वाचन गणेश माळवे, महाराष्ट्र गीत सच्चिदानंद डाखोरे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर उपेंद्र बेल्लूरकर यांनी आभार मानले.आर्यवैश्य महासभा, व्यापारी असोसिशन, पत्रकार संघ, क्रीडा संघटना, विविध सेवाभावी संस्था, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधी आदी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी लोकुलवार परिवाराचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णा मित्र मंडळ, आर्यवैश्य महासभा सेलू, सर्व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

110 कुटुंबांना आधार देण्याचे लोकुलवार अण्णांचे कार्य प्रेरणादायी -- नामदार मेघना साकोरे बोर्डीकर.                
Previous Post Next Post