.*मानवत शहरातील प्रत्येक विकास कामासाठी कटिबध्द**@)> विकास पूरूष डॉ.अंकुशराव लाड*. (मानवत / प्रतिनिधी.)——————————————मानवत शहरातील मोंढा परिसरात असलेल्या दिव्यनगरचा प्रमुख रस्ता कामाचे शुभारंभ झाला असून हा रस्ता परिसरातील नागरिकांना नव्हे तर अडत व्यापारीसाठी देखील सुखकारक आहे. असे प्रतिपादन मानवत शहराचे युवा नेते डॉ.अंकुश लाड यांनी रस्ता उद्घाटन प्रसंगी केले. हा कार्यक्रम १ एप्रिल चे सकाळी १०-३० वाजता पार पडला.मानवत येथील मोंढा परिसर व नागरी वस्ती महावितरण मुख्य कार्यलय या सर्वांचा दुवा सोनार दिव्यनगर येथील रस्ता बांधकामाचे उद्घाटन युवा नेते डॉ अंकुश लाड हस्ते तसेच संत-महंत, मान्यवर, व्यापारी बांधव, नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले. महत्त्वकांक्षी असा हा रस्ता मानवत शहराच्या वैभवात भर घालणार आहे. दिव्यनगर परिसरातील नागरिक , अडत व्यापारी व महावितरण कार्यालय चे अधिकारी यांनी केलेल्या मागणीनुसार या रस्त्याच्या मंजुरीवरडॉ.लाड यांनी लक्ष केंद्रित केलं आणि मंजूर करून घेतला. १ एप्रिल रोजी या रस्त्याचे रीतसर उद्घाटन करताना करण्यात आले . पुढे बोलताना डॉ लाड म्हणाले कि जीवनवाहिनी म्हणून रस्त्याकडे पहिले जाते .या रस्त्यामुळे परिसरात असणारे महावितरण कार्यालय ऑफिस, रसानंद पुरीजी महाराज यांचा आश्रम, अडत व्यापाऱ्यांच्या अवजड वाहनाच्या रहदारीला फार मोठी मदत यामुळे होईल. तसेच परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या रस्त्यामुळे ज्या अडचणी होत्या त्या अडचणी आता सुकर झाल्या, याचे निश्चितच मला समाधान आहे. या रस्ता उद्धघाटन प्रसंगी परिसरात असणाऱ्या आश्रमाचे प्रमुख हभप रसानंद पुरीजी महाराज, जेष्ठ अडत व्यापारी श्रीकिशनजी सारडा, व्यापारी महासंघ अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब मोरे , जिनींग असोशिएशन चे अध्यक्ष गिरीशकुमार कत्रूवार (माजी न. प. सदस्य), बाजार समिती संचालक रंगनाथ वावरे, महेश साखरे, गुलाबसिंग ठाकूर, दामोदरजी बांगड, मनोज बांगड, पंकज लाहोटी, राहुल कडतन, परमेश्वर गोलाईत, माणिकसिंग ठाकूर, भारत ठाकूर, नितीन कत्रूवार, राजूभाऊ खरात (माजी न. प. सदस्य), विनोद रहाटे (माजी न. प. सदस्य), दत्ता चौधरी (माजी न. प. सदस्य), अभिषेक आळसपुरे, श्रीधर कोक्कर आणि बाबा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विनायक कोरडे ,दीपक वाघमारे , प्रधान कांबळे , श्रावण गायकवाड,बालाजी बिडवे ,दादा भदर्गे,रमेश मंगल पल्ली , जावेद भाई,आसद भाई,सईद भाई ,रामा विकी,नय्युम पठाण,अजिज भाई,विजय शहाणे व राहुल चिंचवड यांनी पुढाकार घेतला.***

मानवत शहरातील प्रत्येक विकास कामासाठी कटिबध्द**@)> विकास पूरूष  डॉ.अंकुशराव लाड*.           
Previous Post Next Post