मातंग समाजातील 10 वी आणि 12 वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू येथील नुतन विद्यालय सभागृह येथे पार पडला.सेलू : सेलू तालुक्यातील मातंग समाजातील 30 विद्यार्थ्यांना लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा, प्रमाणपत्र व एक पेन भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार , उद्योजक सिद्धुभाऊ खोसे शिवशिवसेना शहर प्रमुख अजय दळवे , सरपंच नानासाहेब वनवे.सरपंच महादेव लोंढे, रमेशराव गोपले, वाघमारे सर उपस्थित होते.अण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक यांनी महामंडळाकडून गुणवंत विद्यार्थांना कशा प्रकारे महामंडळाकडून प्रोत्साहन पर लाभ मिळतो याची माहिती व महामंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांवर मार्गदर्शन केले, पालकांकडून अजय पाथ्रीकर, सतीश जाधव, पु.ना.बारडकर, महादेव लोंढे, सुशील तोगरे यांनी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम गोपेकर यांनी केले तर सूत्रसंचलन सटवाजी यांनी केले व आभार पायल विठ्ठल कांबळे या विद्यार्थिनीने केले.या कार्यक्रमासाठी उत्तम गोपेकर सर, सटवाजी साठे, अरुण थोरात,अरुण हिवाळे, महेश गायकवाड अखिल भारतीय ग्राहक पंचायत ता.अध्यक्ष सतीश जाधव, सुशील कुमार तोगरे सर, नारायण बोकेफोड, संजय साळवे ,साहेबराव गोरे ,पु.ना.बारडकर सर, अशोक मुजमुले, सचिन मजमुले यांनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0