पिंपळगाव येथे बेसुमार अवैध वाळू उपसा, वाळूमाफिया यांनी दिली शेतकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी. (मारोती एडकेवार नांदेड :जिल्हा प्रतिनिधी )नांदेड : बिलोली तालुक्यातील पिंपळगाव येथे दोन वाळू माफियांनी, रात्रंदिवस अवैध पद्धतीने गोदावरी नदीतील काळी वाळू बेसुमार पद्धतीने महसूल व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून, वाळूमाफियानी रात्रंदिवस अवैधरित्या हजारो ब्रास वाळू उत्खनन करीत आहेत, अशा गंभीर बाबीकडे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्ष होताना दिसून येत आहेत. असे असले तरी मौजे पिंपळगाव परिसरातील, गोदावरी नदी पात्रातून पिंपळगाव येथील दोन वाळू माफियानी, रात्रंदिवस हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करीत आहेत.सदरील अवैध रेती वाळू माफी यांनी गावातील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून तयार करण्यात आलेल्या, पांदण रस्त्याने वाहतूक करून सदरील रस्ता खराब करीत आहेत.याबाबतीत गावातील शेतकऱ्यांनी मारुती राठोड यांना तोंडी जबाब विचारले असता,त्याचा साथीदार तिरुपती हिवराळे यांनी दिनांक 18 रोजी रात्री मध्यप्राशन करून विश्वनाथ डोणगावे या शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.याबाबतीत गावातील शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, उपविभागीय जिल्हाधिकारी बिलोली, तहसीलदार बिलोली, कुंडलवाडी पोलीस स्टेशन, आधी ठिकाणी संबंधित अवैधरित्या त्या रेती उत्खनन करीत असलेल्या वाळू माफिया वर,कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

पिंपळगाव येथे बेसुमार अवैध वाळू उपसा, वाळूमाफिया यांनी दिली शेतकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी.                    
Previous Post Next Post