रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील रहिवाशी तुषार कोळी सोशल मीडियावर जिंकतोय लाखो प्रेक्षकांची मने.. (रावेर/प्रतिनिधी_दि.12 विनायक जहुरे )सध्या सोशल मीडियावर आपल्या सादरीकरणाच्या वेगवेगळ्या शैलिमुळे अनेक कलाकार प्रकाश झोतात येत असातात अगदी असाच आपल्या वेगळ्या शैलि मुळे ,जळगांव जिल्ह्यातील तसेच मध्यप्रदेशच्या सिमेवर असलेल्या रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील तुषार रामचंद्र कोळी आपल्या अभिनयाने दैनंदिन जीवनातील प्रसंगाच्या सादरीकरणाने या कलावंताने खान्देश व मध्यप्रदेश सीमा भागात कौतुकाची थाप मिळवली आहे.यामुळे ,पुनखेडा या छोट्याशा गावाचा बोलबाला वाढला असून त्याच्या फॉलोवरची संख्या वीसहजारावर पोहोचली आहे.आपल्या खान्देशी बोलीभाषेतील संभाषण करून सोशल मीडियावरील कलागुणांच्या माध्यमातून हा कलावंत लाखो युवकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.तुषार हा गेल्या काही वर्षापासून आपल्या अभिनयाने लोकप्रिय झाला असून त्याचे आपल्या परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकडून कौतिक केले जात आहे. आपल्या गावठी मराठी भाषेत हा तरुण आपली दिनचर्या इंस्टाग्राम माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.तुषार कोळी याचे इंस्टाग्रामवर 20 हजार फॉलोवर्स असून या कलाकारांवर जिल्हाभरातून कौतुकाची थाप पडत आहे.

रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील रहिवाशी तुषार कोळी सोशल मीडियावर जिंकतोय लाखो प्रेक्षकांची मने..                                          
Previous Post Next Post