जिल्हा परिषद शाळेतील मुतन्याळ पहिलीच्या विद्यार्थिनीचे खाडखाड वाचन ! (आंनद करूडवाडे बिलोलो प्रतिनिधि )बिलोलो : तालुक्यातील मुतन्याळ येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेवर भास्कर श्रीरामे मुख्याध्यापक व सहशिक्षिका बस्वेश्वरी तेली हे दोनच शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. मात्र येथील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थिनी खाडखाड वाचन करित असल्याने तिचे सह शिक्षकांचे कौतुक होत आहे.गत महिन्यात १६ जून रोजी इयत्ता पहिली वर्गात नवप्रवेश घेतलेल्या कु. वेदिका दिलीप मोरे या सहा वर्षीय चिमुकली विद्यार्थिनीने वर्गात शिकवलेले अध्ययन परिपूर्ण लक्षात ठेवून अवघ्या १५ ते २० दिवसात लिखाणासह न अडखळता खाड-खाड मराठी वाचन करीत असल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थीही भरमसाठ फीभरून खासगी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात एक पाऊल पुढे असल्याचे मुतन्याळ जिल्हा परिषद शाळेच्या या विद्यार्थिनीच्या गुणवत्तेवरून पहावयास मिळत आहे.

जिल्हा परिषद शाळेतील मुतन्याळ पहिलीच्या विद्यार्थिनीचे खाडखाड वाचन !                                                  
Previous Post Next Post