माजरीत भंगार चोरांना अटक, ८७, ५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त !भंगार चोरीत महिलांचाही समावेश. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.20:- माजरी परिसरात पाटाला फाट्याजवळ भंगार चोरटयांना माजरी पोलिसांनी अटक केली होती मात्र त्या चोरलेल्या भंगार सामानाची पुष्टी झाली नव्हती ती दिनांक १७ जुलै रोजी झाली याबाबत चे सविस्तर वृत्त असे की,दिनांक ८ /७/२०२५ रोजी प्राप्त पोलीस सूत्रांच्या गुप्त माहितीच्या आधारावर माजरी पोलिसांना माहिती मिळाली की एका संशयित वाहणात चोरीचे भंगार माजरी परिसरातून वरोरा येथे नेत आहे त्या आधारावर माजरी पोलिसांनी सापळा रचून भंगार चोरासं अटक केले होते, मात्र याबाबत माजरी वेकोलीकडून किंवा इतर कुठल्याही परिसरातून कोणतीही चोरीची फिर्याद नोंदविली गेली नसल्याकरणाने हा चोरीचा मुद्देमाल कुठला आहे हे स्पष्ट झाले नव्हते मात्र दिनांक १७/७/२०२७ ला हा मुद्देमाल वेकोली परिक्षेतातील आहे हे माजरी पोलिसांच्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाले.पोलीस सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार माजरी पोलिसांनी पळसगाव फाट्याजवळ एका संशयित वाहन क्रमांक एम. यच ३४ एस ७२९५ टाटा एस भंगार नेत असल्याचे आढळून आले दरम्यान माजरी पोलिसांनी सदर वाहनाला थांबवून विचारपूस केली असता चालकाने व वाहनातील चोरट्यानीं उडवा उडवीची उत्तर दिले त्यामुळे त्याबाबत माजरी पोलिसांनी खाकीचा धाक दाखवला असता मुद्देमाल चोरीचा असल्याचे कबुली दिली दरम्यान सदर वाहनातील भंगार साहित्यबाबत अधिकचा तपास करत भंगार साहित्य लोखंडी रॉड, पाईप, जुने लोखंडी पत्रे, हे सर्व भंगार वेकोली माजरी येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर माजरी वेकोली येथील मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीवरून तिघांनविरूध यांच्यावर कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्नव्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून एकूण ८७,५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.दरम्यान सदर कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,सा. मा.अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सा. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव,माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमितकुमार पांडये यांच्या मार्गदर्शनात सहायक फोजदार रमेश तुराणकर यांनी केली, याबाबत माहिती देतांना माजरी पोलिसांनी पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले.

माजरीत  भंगार चोरांना अटक, ८७, ५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त !भंगार चोरीत महिलांचाही समावेश.                       
Previous Post Next Post